सौ.सुनीता प्रल्हाद चौधरी यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ धरणगांव तालुका अध्यक्षपदी निवड !.

17

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.18ऑक्टोबर):- धरणगांव येथील एस.टी.वाहतुक नियंत्रक प्रल्हाद चौधरी यांच्या धर्मपत्नी सौ.सुनीता प्रल्हाद चौधरी धरणगांव यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ धरणगांव तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.बबनराव तायवाडे, महिला प्रदेश अध्यक्षा सौ.कल्पनाताई मानकर, प्रदेश महिला कार्याध्यक्षा अँडव्होकेट सौ.ज्योतीताई ढोकणे यांनी सौ.चौधरी यांची निवड केली.

शिवसेनेचे महिला जिल्हाप्रमुख सौ.महानंदाताई पाटील, मा.नगराध्यक्षा सौ.ऊषाताई वाघ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ सौ.प्रतिभा चौधरी, सौ.भारती चौधरी, नलीनी करणकाळ धुळे, प्रियंका ठाकरे आदींनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.ओबीसी महिला महासंघाच्या माध्यमातून ओबीसींसाठी काम करेल व माझ्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन सौ.चौधरी यांनी केले. त्यांचे धरणगाव शहरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.