भिऊ नकोस.मी तुझ्या सोबत आहे!

25

आजचा गंभीर प्रश्न आहे.एक मंत्री होता.त्याने भ्रष्टाचार केला.लोकांना राग आला.त्याला डावलून दुसरा निवडून दिला.तो मंत्री झाला.त्यानेही भ्रष्टाचार केला.दुसरा,तिसरा,चोथा,पांचवा.जो येतो तो चोरी करतो.ही चोरी काही केल्या थांबत नाही.पोलिस,सीआयडी, सीबीआय,इडी, कोर्ट अशी सर्वच यंत्रणा फेल ठरली आहे.आरटीआय ने माहिती मिळते.पण चोरांवर कारवाई होत नाही.का?हे असे का होते? यावर इलाज नाही काय?तो शोधला पाहिजे.मला वाटते, पोलिस आणि कोर्ट येथे अपुरे पडतात.कधी कधी तेच यात सहभागी होतात.नव्हे तेच तक्रारदाराला त्रास देतात.तर जावे कुणाकडे? बधीर माणसाला हे समजत नाही म्हणून खटकत नाही.पण संवेदनशील माणसाला हे खटकते.तो धडपड करतो.पण राजकीय चोराला अधिकार जास्त असल्याने संवेदनशील माणसाला तो छळतो.पोलिस व कोर्टाने न्याय दिला नाही तर भगतसिंग सारखे गोळ्या घातल्या तर! एक मारला जाईल.पण इतर तेच करतील.चोरी.यावर सामुहिक उपाय करता आला पाहिजे.जो सहज लागू होईल.

पन्नास वर्षे कांग्रेसची सत्ता होती.त्यातील बहुतेक मंत्री स्वातंत्र्य लढ्यातील होते.म्हणून भ्रष्टाचार कमी होता.त्यामुळे राज्यघटना लिहीतांना हे लक्षात आलेच नाही कि, मंत्री ला जास्त अधिकार दिले गेले.पण आता ती पिढी गेली.मच्छरदाणीत जन्माला आलेली पीढी सत्तेवर आहे.ते आधिकाराचा गैरवापर करीत आहेत.आता लोकांना जाणवू लागले,खटकू लागले.हे हाताबाहेर गेले आहे.अनियंत्रित झाले आहे.दर्द की दवा है ,हद से गुजर जाना.म्हणजे दुखाने बधीर व्हायचे का? बधीर होता येत नाही.मग दुसरा पर्याय काय?गीतेत सांगितले तसे मानायचे का? धर्माला ग्लानी आली कि म्हणे ईश्वर जन्मास येतो.ही ग्लानी कोणत्या स्तरावर येईल तेंव्हा ईश्वर जन्मास येईल? अशी ईश्वराची वाट पाहात किती पिढ्या निघून जातील? मला वाटते,असे ईश्वराची वाट न पाहाता आपण मानवानेच ईश्वरासारखे काम केले तर, अधिक चांगले.

सद्या तरी आपल्या कडे एक पर्याय आहे.निवडणुकीत चोरांना डावलणे.सज्जनांना निवडून आणणे.कोणी बावळट विचारतो,सज्जन कसा ओळखायचा? जर माणसाला सज्जन आणि दुर्जन ओळखता येत नसेल तर तो तरी काय कामाचा? त्याच्या मताला काहीच महत्त्व नाही.माणूस आहे,मेंदू आहे.नाक,कान ,डोळे आहेत‌.बोलतो,वाचतो,लिहीतो.तरीही सज्जन ओळखता येत नसेल तर तो जनावर असू शकतो.त्याचा किंवा त्याच्या मताचा विचार करायचा नाही.त्याला दिलेला मतदानाचा अधिकार सुद्धा घातकच आहे.तो मत विकून टाकतो.तो तर माणूसच नाही.जनावर आहे.त्याची चिंता करणे सोडून द्यावी लागेल.विकला जातो,केंव्हाही विकला जाऊ शकतो,तर तो जास्त धोकादायक.जास्त घातक.मला वाटते हाच माणूस खरा लोकशाही चा शत्रू आहे.हाच माणूस देशाचा शत्रू आहे.हाच माणूस आपला शत्रू आहे.या माणसाला राशन,घर,शिक्षण,दवा फुकट देऊनही जर मत विकत असेल तर हाच खरा घातक आहे.देशाचा,लोकांचा शत्रू आहे.या शत्रूला नियंत्रणात ठेवणे किंवा बाजूला सारणे आवश्यक झाले आहे.

देशाचा ,लोकांचा, लोकशाही चा शत्रू तर ओळखला.त्याला नष्ट तर करता येणार नाही.तर त्याला शह द्यावा लागेल.त्याला चेकमेट द्यावा लागेल.म्हणून मत न विकणारा माणूस एकत्र आला पाहिजे.मत असलेला माणूस एकत्र आला पाहिजे.जो स्वताचे तसेच दुसऱ्याचे मत बनवू शकतो,अशा माणसाला एकत्र यावे लागेल.अशी माणसे आम्ही जळगाव जिल्ह्यात, शहरात शोधतो.त्याला सावध करतो.जागृत करतो.बापा रे ,उठ तू बेसावध आहेस म्हणून शत्रू ने लोकशाही नासवली.तू विखुरलेला आहेस म्हणून तुझे मत प्रभावी होत नाही.आणि तू दुषणे देऊन थांबतो.हे सुद्धा ठिक नाही.तू आणि तुझ्यासारखा संवेदनशील माणूस एकत्र आला कि, तुला हवा तसा माणूस, सज्जन माणूस निवडून आणू शकतो.तुझ्या मताचा चांगला परिणाम देऊ शकतो.त्यासाठी तुला एकत्र येणे आवश्यक आहेच.मी नाही.मला नको.असे नकारार्थी म्हणून चालणार नाही.त्यात तुझा नाश होत आहे.तुझ्या डोळ्यांदेखत.तू स्वताला हतबल समजतो.राजकारणापासून स्वताला दूर ठेवतो.

पण ,तू कितीही पळ काढला तरीही राजकारण तुला सोडणार नाही.बघ, जळगाव शहराचे रस्ते कसे बनले? रस्ते नाहीतच. खड्डेच आहेत फक्त.आणि तू त्यावर रांगोळी काय काढतोस.अगरबत्ती काय लावतोस.त्यात झाडे काय लावतोस.फोटो काढून पेपरला काय देतोस.ही कृती असामान्य मानसिकतेचे लक्षण आहे.हे विकृतीचे लक्षण आहे.हे हतबलतेचे लक्षण आहे.ही हतबलता घालवायची आहे.कठीण काम नाही.हा आमदार नालायक आहे.रस्ते बनवू शकला नाही.हा नगरसेवक नालायक आहे.रस्ते बनवू शकला नाही.असे म्हणण्याची हिंमत कर.कर एकदा हिंमत.तू त्याची भीती बाळगू नकोस.मी बाळगतो का?, मुळीच नाही.तरीही मी जगतो ना! निर्भय पणे तसा तू सुद्धा जगशील,निर्भयपणे. तर मग,ये माझ्या सोबत.मी निर्भय.तू निर्भय.आपण एकत्र आलो तर तो आमदार,तो नगरसेवक आपल्याला घाबरून पळ काढील.त्याला आता सुधारायचे नाही.त्याला बदलायचे आहे.भिऊ नकोस,मी तुझ्या सोबत आहे.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव