बरबडा येथील शिक्षक एन. एम. तिप्पलवाड यांना डॉ. कलाम राष्ट्रउभारणी पुरस्कार प्रदान

31

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.19ऑक्टोबर):-नांदेड- बरबडा येथील सहशिक्षक एन. एम. तिप्पलवाड हे जवाहरलाल नेहरू मा. व उच्च मा. विद्यालय बरबडा या ठिकाणी कार्यरत असुन त्यांना ड्रीम फॉउंडेशन व डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम मिशन आयोजित राज्यस्तरीय डॉ कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा सन्मान सोहळा 2022 रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे संपन्न झाला.

यावेळी मा. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी IAS उपमहासंचालक यशदा पुणे, नांदेड जिल्ह्याचे भूमीपुत्र मा. डॉ. बबनराव जोगदंड प्रभारी अधिकारी प्रकाशन, माध्यम व प्रकाशन केंद्र यशदा पुणे, मा श्री मंगेशजी चिवटे कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधी विशेष कार्याधिकारी मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे OSD, मा.श्री.संजयजी आवटे संपादक दै लोकमत पुणे, मा. श्री. चंद्रकांत निनाळे सहसंचालक व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे, मा. डॉ. अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ डीआरडिओ पुणे, येवले अमृततुल्य चहा चे संचालक श्री. नवनाथ येवले, ड्रीम फाउंडेशन चे संचालक काशिनाथ भतगुणकी व ड्रीम IAS सेंटर पुणे संचालिका संगीता पाटील मॅडम या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या 91 व्या जयंती निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, युवा जण जागृती, व वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान व प्रेरणादायी असणारे आणि शिक्षणाच्या माध्यमातून विधार्थी घडवणारे अशांना हा पुरस्कार दिला जात असतो असे सांगण्यात आले आहे. यंदा हा पुरस्कार तिप्पलवाड यांना देण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानीत केले गेले आहे.

आता या फाउंडेशन च्या वतीने सन्मानीत करण्यात आले आहे. व नंतर मान्यवरांच्या व्याख्यांनाची मेजवानी ऐकायला सर्वांना मिळाली आहे. त्यांच्या सन्मानमुळे जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती चे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे, शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, पर्यवेक्षक सूर्यकांत फड, रोशनी कंप्युटर चे संचालक तथा देशोन्नती चे पत्रकार किरण हनमंते, विश्वनाथ बडूरे गुरुजी,आणि शाळेतील सर्व कर्मचारी, वर्गमित्र मंडळी, पत्रकार बांधव आणि गावाकऱ्यातून अभिनंदन केले जात आहे.