आयकर कपात ची समस्या पंधरा दिवसात निघणार निकाली-गट विकास अधिकाऱ्यांचे पुरोगामी शिक्षक समिती ला आश्वासन

18

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.20ऑक्टोबर):- पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांच्या अनेक समस्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. शिक्षकांचा कपात झालेला आयकर त्यांचे पॅन नंबर वर जमा न झाल्याने अनेक शिक्षकांना आयकर विभागाच्या नोटीस आलेल्या आहे. या व इतर समस्यांचे अनुषंगाने पुरोगामी शिक्षक समिती चे शिष्टमंडळाने गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी चिमूर यांना निवेदन देऊन चर्चा केली. दरम्यान आयकर कपात ची समस्या पंधरा दिवसात निकाली काढून संघटनेची सभा लावण्याचे आश्वासन गट विकास अधिकारी यांनी संघटनेला दिले.

शिक्षकांचा नियमित कपात आयकर जमा न होणे. चुकीच्या पॅन नंबर वर आयकर जमा होणे. एलआयसी चे कपात हफ्ते, बँकेचे चेक जमा न करणे, सेवापुस्तके अद्ययावत बाबत शिबिर चे नियोजन, रजा प्रवास सवलत देयके, केंद्रप्रमुख प्रभार देतांना मनमानी कारभार, सेवानिवृत्ती प्रकरणे प्रलंबित असणे या व इतर अनेक समस्या मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचे शिष्टमंडळ भेटी चे दरम्यान पंचायत समिती चिमूर चे गट विकास अधिकारी राजेश राठोड, सहाय्यक गट विकास अधिकारी कु. सहारे, लेखा विभाग, शिक्षण विभाग, संघटनेचे पदाधिकारी रवींद्र वरखेडे, गोविंद गोहणे, जनार्दन केदार, मुरलीधर नन्नावरे, गोवर्धन ढोक, सरोज चौधरी उपस्थित होते.
——————————————-

“सलग दोन दोन वर्षे शिक्षकांच्या आयकर कपात ची समस्या उध्दभवणे याला कारणीभूत पंचायत समिती चे निष्काळजीपणाचे धोरण आहे. याचा नाहक भुर्दंड शिक्षकांना बसत आहे. 15 दिवसात समस्या निकाली न निघाल्यास संघटना आंदोलन उभारेल.”- गोविंद गोहणे (तालुका अध्यक्ष-महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती)