

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.21ऑक्टोबर):- तालुक्यातील मांडवा येथील शांती धाम मध्ये लोकसहभागातून उभारलेल्या निवारा शेडचा लोकार्पण सोहळा दि.२१ ऑक्टोंबर २०२२रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणून कृषीभूषण तथा मोक्षधाम समिती पुसद अध्यक्ष दिपकभाऊ आसेगावकर, प्रमुख अतिथी म्हणून य.जि.म.स.बँक पुसदचे संचालक अनुकूल चव्हाण, ए.पी.ओ.नरेगा विभाग पं.स.पुसद रवि जाधव, तांत्रिक अधिकारी नरेगा पं. स. पुसद विनोद भोरगे, पत्रकार तथा मोक्षधाम समिती पुसद सहसचिव ललित सेता, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विजय राठोड ,पोलीस पाटील दत्तराव पुलाते, माधव डोळस इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ धाड यांनी केले.
यावेळी सर्व मान्यवरांनी समशानभूमीची पाहणी करून कार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे कौतुक केले.तसेच यावेळी दीपकभाऊ आसेगावकर व ललित सेता यांनी स्मशानभूमीच्या पुढील कार्यासाठी नियोजनपर मार्गदर्शन केले.
यावेळी रंगराव डोळस, प्रकाश ढोले,रमेश ढोले,हरिभाऊ आबाळे, दैवशाला डोळस,बबिता सोनटक्के, शिवाजी चिरमाडे, कैलास राठोड,दादाराव घुक्से, कैलास खडसे ,शिवाजी वानखेडे,गोवर्धन ईखार,देविदास गजभार, गजानन आबाळे, संदिप आबाळे,कपिल ढोले,बजरंग राठोड,प्रदुम्न आबाळे, राहुल जाधव,अर्जुन आडे, दुर्गा ग्रामसंघाचे पदाधिकारी तसेच इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार बाळु धाड यांनी मानले.