बाविस प्रतिज्ञा

16

माणसा वाचून घे बाविस प्रतिज्ञा
कुविचारांची दृष्टी गळून पडेल.
भेदाभेदांची अंधश्रद्धा मिटून जाईल.
खोटारडेपणाचा अंधार गर्भ नष्ट होऊन
नवमंथनाची उजेडपहाट निर्माण
होईल.कावेखोरांच्या प्रबोधनाला बळी पडण्यापेक्षा
चवदा ऑक्टोंबर एकोणविसशे छपन्नचा
भीमसूर्य तुमच्या गजंलेल्या मेंदूला
क्रांतीऊर्जाची प्रखरता देऊन जाईल.

मनातील प्रश्नश्रृखलेच्या
समीकरणाची उकल करून देईल.
मानवा वाचून घे एकदा बाविस प्रतिज्ञा
तुझे जीवन सूर्यपोर्णिमा होऊन जाईल.
छताड डोळे उघडे ठेवणारा मानव
मुक्तीचा क्रांतीज्वाळ प्रस्फोटीत होईल.
नव्या जन्माचा अविष्कार होईल.
नव्या जन्माचा अविष्कार होईल…

✒️संदीप गायकवाड नागपूर(मो:-९६३७३५७४००)