वंचिताच्या दारी दिवाळीला रोटरी

39

✒️लातूर(पुरोगामी न्यज नेटवर्क)

लातूर(दि.22ऑक्टोबर):– रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो च्या वतीने लातूर शहरालगत रस्त्याच्या कडेला पाल, झोपडी करुन राहत असलेल्या 60 कुटुंबाना 50 साड्या व 60 दिवाळी फराळाचे किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे सचिव देवेंद्रजी आयलाने यांनी रोटरी क्लब तर्फे तेथील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व लोकांना व्यसन व त्यांच्या मुलांच्या शिक्षणा बाबत मार्गदर्शन केले.

*व्यसनाला दूर करा व शिक्षणाला जवळ करा.* असा संदेश त्यांच्या मनोगता तून दिला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नागनाथजी आगवाने, सचिव देवेंद्रजी आयलाने, प्रो. चेअरमन रविकिरण चव्हाण, शशिकांत चलवाड, संतोष कासले, सागर मलवाडे, सुदर्शन बोराडे, दिलिप पिनाटे, कालिदास लांडगे, रविराज वाकुरे, जितेंद्र नरवडे, रवि इंगळे, विकास कातपुरे, गणेश खाडप, दत्ताभाऊ पनाळे, माने सर व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी तेथील लोकांनी बॅड, हालगी वाजवून रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.