वंचित बहुजन आघाडी मौजपुरी सर्कलची महत्त्वाची बैठक संपन्न..

31

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जालना(दि.22ऑक्टोबर):- वंचित बहुजन आघाडी जालना तालुक्यातील मौजपुरी सर्कलची मानेगाव येथे दिनांक २१/१०/२०२२ रोजी संध्याकाळी ६:३० वा महत्त्वाची बैठक जालना जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव यांच्या अध्यक्षतेखाली व जालना जिल्हा संघटक आणि मौजपुरी सर्कल निरिक्षक राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जालना तालुका सचिव बाबासाहेब लहाने, निर्वाण खरात,विकास लहाने, राजरत्न आचलखांब यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

या बैठकीत मौजपुरी सर्कल मधील सर्कल व मौजपुरी, मानेगाव या दोन्ही गणाच्या कार्यकारिणी मध्ये बदल करण्यात आले. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या ताकतीने निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चा झंझावात कार्यक्रम जसे गाव तिथे शाखा,बैठका, मेळावा आणि सभासद नोंदणी अभियान या सर्कल मध्ये सुरू करावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रा संतोष आढाव, राजेंद्र खरात, बाबासाहेब लहाने, निर्वाण खरात, विकास लहाने, राजरत्न आचलखांब, प्रकाश रंधवे, देविदास वानखेडे, बाबासाहेब पटेकर अंबादास पटेकर, कैलास गायकवाड, सर्जेराव लहाने, गणेश पोकळे, कृष्णा भदरगे, भोले गायकवाड, अरविंद लहाने, बाबासाहेब मोरे, गिरधारी वानखेडे, परमेश्वर आचलखांब, उमेश रंधवे, अशोक आचलखांब, विकास लहाने, विलास खरात, अकाश जाधव, निर्वाण खरात, प्रकाश शिंदे, चेतन शिंदे, बाबासाहेब लहाने सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते