

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.24ऑक्टोबर):- महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी बाभूळगाव येथील विकास देविदास पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशाने राष्ट्रीय जनसंपर्कप्रमूख जी.एम.भगत यांच्या शिफारशी नुसार व राज्याध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, धरणगाव तालुकाध्यक्ष पदी श्री.पाटील यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पोलीस मित्र संघटनेचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विकास पाटील हे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या तालुका कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
श्री.पाटील हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात निरंतर उपक्रम राबवित असतात. अश्या लोकोपयोगी व समाजहिताच्या कार्यामुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटना व शहर, परिसरातून अभिनंदन केले जात आहे.