गोदाकाठ मेडिकल असोसिएशन च्या वतीने दिवाळी या पवित्र सणाच्या निमित्ताने सेवाभाव म्हणून पेठ तालुक्यात 125 किलो फराळ व आरोग्य तपासणी मोफत शिबीर

29

✒️शांताराम दुनबळे(“विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.24ऑक्टोबर):- दिवाळी पवित्र सणाच्या निमित्ताने धनत्रयोदशी या पवित्र दिवशी गोदाकाठ मेडिकल असोसिएशनच्या वतीने सेवाभाव म्हणून पेठ तालुक्यातील उस्थळे या गावी तेथील नागरिकांसाठी दिवाळीचे 125 किलो फराळ व आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आला.

उस्थळे हे गाव सायखेडा पासून साधारण 84 किलोमीटर आहे या कार्यक्रमाला व आरोग्य शिबिराला उपस्थित गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गीते सर उपाध्यक्ष डॉक्टर रोहिणी घुगे मॅडम, उपाध्यक्ष डॉक्टर सुनील वाघ सर, उपाध्यक्ष डॉक्टर उत्कर्ष शिंदे सर, सचिव श्री योगेश केकाण व इतर सन्माननीय सदस्य डॉक्टर सुमंत दीक्षित सर, डॉक्टर अनिल बोराडे सर, डॉक्टर दगू हाडपे सर, डॉक्टर अनिल महाजन सर, डॉक्टर सुभाष पिंगळ सर, डॉक्टर संजय मत्सागर सर, डॉक्टर उत्तम फरताळे सर, योगेश पगारे हे सर्व आवर्जून उपस्थित होते.