आ. रवी राणा यांच्या विरोधात कामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल:-वैभव जावळे

52

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.25ऑक्टोबर):-अमरावती चे आमदार रवी गंगाधर राणा यांच्यावर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे कडून कामती पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार ओमप्रकाश (उर्फ) (बच्चुभाऊ) कडू यांच्या विरोधात, आमदार रवी गंगाधर राणा यांनी खोटे आरोप करणे चालू आहे रवी गंगाधर राणा यांच्याकडून सोशल मीडिया द्वारे बच्चू(भाऊ)कडू यांची बदनामी करण्यात येत आहे 

आमदार रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असे सांगितले की बच्चू कडू जे काही आंदोलन करतात ते फक्त तोडजोडी व दमडी साठी करतात बच्चू कडू हा सोंगाड्या आहे त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचे आमदार रवी गंगाधर राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांचा पुतळा जाळण्यात येईल असे तक्रारी निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना मोहोळ तालुक्याच्या वतीने कामती पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहे

*चौकट:* मा,राज्यमंत्री प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू (भाऊ) कडू यांचे अपंग दिव्यांग विधवा निराधार शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य लोकांसाठी किती काम आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि बच्चुभाऊ कडू यांच्यावर बोलायची रवी राणाची लायकी पण नाही रवी राणाने एकदा कुठे किराणामाल वाटला म्हणून जास्त हवेत उडू नये, महाराष्ट्रातील प्रहार सैनिक पेटून उठले तर त्यांना त्यांच्या गावात राहण्याची परवानगी सुद्धा प्रहार सैनिका कडून घ्यावी लागेल
*वैभव जावळे*
*प्रहार तालुकाध्यक्ष मोहोळ*

निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर कार्याध्यक्ष अनिल पाटील,शरद बारडोळे नागेश माने नितीन माडकर दादा धोडमीसे अरविंद सुतार रघुनाथ पवार श्रीमंत कदम केशव सुतार आप्पा टेळे उमेश कदम विकास कदम उदय कदम बबलू वाघमारे इत्यादी उपस्थित होते