वेकोलि वसाहतीच्या वासियांनी घेतली भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट

62

🔸वेकोलिने क्वाॅर्टर खाली करण्याची दिली नोटीस

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.26ऑक्टोबर):-येथील वेकोलि वसाहतीच्या गांधी नगर, सुभाष नगर येथे राहणाऱ्या २०० कुटुंबियांना क्वाॅर्टर खाली करण्याची नोटीस वेकोलिने दिली.त्याअनुषंगाने वेकोलि वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली व समस्या सांगितली. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले.

याप्रसंगी महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त केले.वेकोलि वसाहतीत अनधिकृत रित्या राहणाऱ्या नागरिकांना क्वाॅर्टर खाली करण्याची नोटीस वेकोलिने दिली. त्यामुळे तत्काळ क्वाॅर्टर खाली करावे लागत असल्याने त्यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला. लहान मुलांच्या परीक्षा सुरु आहे त्यामुळे कुठे जाऊन राहायचे अश्या विवंचनेत असलेल्या महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली व आपली समस्या सांगितली.

यापूर्वी वेकोलि वसाहतीच्या महिलांनी काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांची आपल्या समस्येला घेऊन भेट घेतली होती परंतु त्यांनी फक्त आश्वासन दिले त्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरल्याने वेकोलि वसाहतीच्या महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, राजेश मोरपाका, अमीना बेगम, नजमा कुरेशी, निशा रामटेके, प्रज्ञा साव, शिल्पा गोरे, सलोमी मामीडपेल्ली, सुरेखा तोडासे, बेबी श्रीपेल्लीवार, लिंगय्या तालापेल्ली, रामेश्वरी गोदारी, आचल कांबळे, मीरा कातरकर, मंगला पत्रकार, कल्पना पाझारे, लता तक्कला, शाम रासनाला, सनी मंडल, रेश्मा अट्टेला, मंदा मडावी, श्रीनिवास गादम, शबाना शेख, मुस्तफा शेख, किशोर इंगोले, नंदा अट्टेला, सोनाली अट्टेला, सरोजा डोरके, उर्मिला गोगला, लक्ष्मी बारसागडे, राकेश दिंडीगाला सुमित मंडल, अक्षय लठ्ठा, गजानन उलमाले, विशाल दामेर, धर्मराज कावेरी उपस्थित होते.