प्रवीण बागड़े यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

    56

    ✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    नागपुर(दि.27ऑक्टोबर):-महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर तर्फे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना “उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार” विद्यापीठ मुख्यालय येथे आयोजित सोहळयात बहाल करण्यात आले. या कार्यक्रमात सन् 2017-18, 2018-19 व 2019-20 या वर्षातील वर्ग 3 व वर्ग 4 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    सदर पुरस्कार विद्यापीठ मुख्यालय अधिनस्त महाविद्यालय/प्रक्षेत्रे/ संस्था मधील वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांमधुन प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना रु. 10,000/- व वर्ग 4 करीता रु 6,000/- रोख रक्कम, प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले.

    सदर पुरस्काराचे उदि्दष्ट म्हणजे विद्यापीठ तसेच विद्यापीठ अधिनस्त महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेणे, कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सेवा तत्परता व विद्यापीठाप्रती आत्मीयता वाढविणे, कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट आणि असाधारण योगदान देण्याची भावना जोपासने व त्यांची कार्यक्षमता वाढविणे असे आहे.

    वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांमधुन 2017-18 वर्षीचा जाहीर झालेला उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार विद्यापीठाच्या संचालक, विस्तार व शिक्षण विभागातील लघुलेखक *श्री प्रविण मोरेश्वर बागडे* यांना प्रदान करण्यात आला. श्री बागड़े यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्‍यातील दूधबर्डी येथे २० हेक्टर सरकारी जमीन संपादित करून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी शासन निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याआधी ते महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे स्वीय सहाय्यकही होते. शासन आणि प्रशासनाच्या अनुभवासोबतच त्यांना समाजसेवेचीही आवड आहे. त्यांनी कोविड अंतर्गत अनेक रुग्णांची सेवाही केली आहे.

    कुलगुरू कर्नल डॉ (प्रो) आशीश पातुरकर, कुलसचिव श्री सचिन कलंत्रे, कार्यकारी परिषद सदस्य श्री सुधीर दुद्धलवार, नियंत्रक (वित्त व लेखा) श्रीमती मनीषा शेंडे, पशुविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ शिरीष उपाध्ये, संचालक (संशोधन) डॉ नितिन कुरकुरे, संचालक (विस्तार शिक्षण) डॉ अनिल भिकाने, अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ सुनील सहातपुरे, विद्यापीठ ग्रंथपाल श्री सुनील गावंडे, परीक्षा नियंत्रक डॉ भूषण रामटेके, नागपुर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ आरजु सोमकुवर आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जावळे यांनी केले. तर आभार उपकुलसचिव (आस्थापना) डॉ अजय गावंडे यांनी मानले.