विदर्भ राज्य खो-खो संघात प्राची चौधरी व प्रणाली मोहूरतले यांची निवड

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27ऑक्टोबर):-नुकतीच नागपूर येथील काटोलमध्ये राज्य किशोर व किशोरी गटातील खेळाडूंची निवड चाचणी संपन्न झाली. या चाचणीतून 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत फलटण सातारा येथे होणाऱ्या किशोर व किशोरी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विदर्भ राज्य संघाची निवड करण्यात आली.

यात किशोरी गटातुन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातून दोन खेळाडूंची निवड झाली आहे.प्राची चौधरी व प्रणाली मोहूरतले या चंद्रपूर जिल्हा खो-खो असोसिएशन संचालित तालुका क्रीडा संकुल वरोरा मधील सराव करणाऱ्या खो-खो खेळात विशेष कौशल्यप्राविण्यप्राप्त खेळाडू आहेत. जिल्हा खो-खो असोसिएशन व तालुका क्रीडा कार्यालय संचालित खो-खो प्रशिक्षण नियमितपणे सकाळ व संध्याकाळ सराव वर्ग चालतात.

त्यासाठी सुधीर कुंभारे (NIS) , संजय जांभुळे व स्वप्नील सांयकार यांचे मार्गदर्शन लाभते.प्राची आणि प्रणाली ह्या विवेकानंद शाळा, वरोराचे विद्यार्थीनी असून.त्यांच्या अथक परिश्रम व सरावाने विदर्भ राज्य संघात झालेली निवड चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे . त्यांच्या निवडीबद्दल विदर्भ खो खो असोसिएशनचे सचिव सुधीरजी निंबाळकर ,चंद्रपूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव अशोक मोरे , वरोराचे तालुका क्रीडा अधिकारी विजय ढोबाळे, तसेच तालुका क्रीडा समन्वयक गणेश मुसळे व जिल्हा खो खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक उरकांडे यांनी विशेष अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे .