झाडे तोडल्याचे वादावरुन झाले भांडण-दोन्ही कुटुबियांकडून एकमेकाविरोधात केली तक्रार

14

✒️नागभिड,तालुका प्रतिनिधी(संजय बागडे)मो:-9689865954

नागभिड(दि.28ऑक्टोबर):– दिनांक २ ऑक्टोबर ला माझ्या आवारातील घराशेजारी असलेले फळझाडे बुध्या पासुन का तोडली असे घरमालक संजय बालाजी येरणे यांनी विचारले असता,नागभिड येथील काॅग्रेस तालुका अध्यक्ष व त्यांचे कुटुंबियाणी संजय येरणे यांना बेदम मारहाण केली. काँग्रेस अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबावर संजय येरणे यांनी गुन्हा नोंदवला.

पञकार संघाच्या आयोजित पत्रकार परिषद मध्ये संजय बालाजी येरणे यांनी झालेल्या अन्याया बाबत कथन व्यत्य केले ,यावेळी चौधरी कुटुंबातील पुरुष व महिला यांनी शिवीगाळ करीत कालर पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तोंडावर धारधार वस्तूनी मारुण जखमी केले व कपडे फाडले आणि जिवे मारण्याची धमकी दिली असे सांगितले.

विरोधात उलट – सुलट चौधरी कुटुंबाने महिलाचा हात धरले व शिविगाळ केली व मारहान केली आहे अशी माझ्या विरोधात खोटी रिपोर्ट दर्ज केली असे सांगितले. अनेक दिवसापासुन घराच्या जागेचा वाद असुन ते येरणे व चौधरी यांची नागभिड न्यायालय येथे केस चालु आहे, येरणे हे सध्या पुणे येथे आपले कुटुंबासह राहत आहे, त्यांच्या नागभिड घरी किरायादार राहत आहेत,