ब्रम्हपुरीतील सौ तृप्ती मेश्राम यांनी केले मेकअप छायाचित्राचे सादरीकरण

16

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28 ऑक्टोबर):- दिवाळी सण हा सर्वांच्या आनंदाचा व उत्साहाचा असतो. सर्व आपआपल्या पद्धतीने दिवाळी हा सण साजरा करीत असतात. यातीलच ब्रम्हपुरीतील सौ. तृप्ती मेश्राम यांनी केले मेकअप छायाचित्राचे सादरीकरण.अंधारावरती प्रकाशाचा विजय, दुष्टचक्रांवरती विजयाची पताका म्हणून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी.

अंधार कितीही गडद असला तरीही प्रकाशाची एक किरण त्याला भेदून निघते, त्याच्यावर मात करू शकते, म्हणून अंधारावर प्रकाशाच विजय मिळवू शकतो , म्हणून उजेडाची दिवाळी , दिव्यांची दिवाळी आपण साजरी करत असतो.

“लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभते कडा रांगोळी” असे म्हणत दिवाळी या सणाला जसे उजेडाचे महत्त्व आहे, त्याप्रमाणेच त्याचे प्रतीक म्हणून दिव्यांना सुद्धा आहे, दिव्याची ज्योत ज्याप्रमाणे जळत असते , ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देत असते, त्याप्रमाणे आपणही आयुष्यात सत्कर्म करायला हवे.याची मूर्तीमंत उदाहरण साकारत ब्रह्मपुरी येथील नामांकित मेकअप आर्टिस्ट सौ. तृप्ती मेश्राम यांनी मेकअप छायाचित्राचे केले सादरीकरण .