महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

16

🔸चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी मुन्ना तावाडे यांची नियुक्ती…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.29ऑक्टोबर):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये चंद्रपुर जिल्हाध्यक्ष म्हणून मुन्ना तावाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुन्ना तावाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबत जुळलेले असून ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर गजभिये यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जातात. सोबतच चंद्रपुर जिल्हाचे माजी पालकमंत्री विजय वडेटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष बांधणीसाठी ते अनेक महिन्यापासून काम करत आहेत.

चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे बाळू धानोरकर, चंद्रपुर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर अध्यक्ष रामू तिवारी आणि इतर कार्यकर्त्यांशी तावाडे यांचे जिव्हाळ्याचे मैत्री संबंध असल्याने तावाडे यांच्या नियुक्तीने जिल्हात काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया सेल मजबूत होईल असा आशावाद आहे. कारण तावाडे स्वतः सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असून सामाजिक, राजकीय अशा विविध घटनांवर विशेष लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे तावाडे यांची सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे…