स्वराज्य हवे आहे?शक्य आहे!

23

भाजप चे सरकार रशिया व चीनच्या दिशेने जात आहे.भारतीय सत्ता एकाच पक्षाकडे एकवटत आहे. भारतीय संपत्ती ठराविक लोकांकडे जमा होत आहे.आणखी होईल.आणि ते सरकार ला इशारा वर नाचवतील.सरकार नाचेल ही.कारण सरकार चालवणाऱ्या नेत्यांना पैसा पाहिजे.जो गरीब मतदारांना दान करावा लागतो.रेवडी .तेंव्हाच तो मतदार मताचे दान करतो. आज ही असेच सुरू झाले आहे.गरीब लोक दोन चारशे रूपयात मत भाजपला विकून टाकतात.हा आरोप नाही.हा तर्क नाही.हे जळगाव महापालिका व जळगाव शहर विधानसभा निवडणूकीतील वास्तव आहे.हरिविठ्ठलनगर मधे ७५टक्के मतदार आरपीआयचे,ओबीसींचे बहुजन वंचित चे विचारांचे आहे.तरीही येथील ७५ टक्के मतदान २०१८च्या महानगरपालिका व २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला पडले.निवडणुकीतील आकडेवारी निवडणूक अधिकारी कडे उपलब्ध आहे.पडताळून पाहाता येईल.मी प्रत्यक्षदर्शी आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दलित, वंचित, पिडीत लोकांसाठी राज्यघटनेचा मसुदा लिहीला,त्याच लोकांनी लोकशाही नाकारली आहे.असे माझे स्पष्ट मत आहे.अनुभव आहे.सरकारी दप्तर मधील आकडेवारी सांगते.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगाव च्या कुसुंबा विमानतळावर उतरले.वेळे अभावी तेथेच सभा झाली.श्रोते मात्र हरिविठ्ठलनगर व समता नगर मधून दिडशे रूपये रोख व नाश्ता व वाहतूक खर्च देऊन आणले होते.मी स्वतः या लोकांना ओळखतो.विचारले, तुम्हाला नरेंद्र मोदी आवडतात का? म्हणे , नाही.पण आपल्याला फुकटफाकट दिडशे रूपये व नाश्तापाणी मिळत असेल तर काय हरकत आहे?आमचा फायदा होतो,तुमच्या पोटात का दुखते? मी खजिल झालो.माझा भ्रमनिरास झाला.अरे! हे मतदार पांच वर्षे माझ्या सोबत आंदोलन करीत होते.यांना शासकीय लाभ मिळवून दिला .२०१४पासून केसरी कार्डवर राशन बंद केले होते,ते चालू करून दिले.आणि हाच वर्ग,हेच लोक मोदींचे भाषण ऐकायला विमानतळ वर जात आहेत.यांनी लोकशाही नाकारली आहे‌.विकली आहे.फक्त दोन दिडशे दोनशे रूपयात.

जळगाव शहरात महानगरपालिका आहे‌.येथे चार लाख मतदारापैकी दोन लाख मतदार मत विकतात.ज्या उमेदवार कडे किमान दोन लाख मतदार खरेदी करण्याची आर्थिक कुवत आहे तो कोणीही माणूस आमदार म्हणून निवडून येऊ शकतो.दारू वाला,सट्टावाला, कुंटणखाना चालवणारा सुद्धा.या तंत्राने दाऊद इब्राहिम सुद्धा जळगाव ला आमदार निवडून येऊ शकतो.२०१४ मधे जळगाव मधे भाजप चा श्रीमंत माणूस आमदार झाला.नव्वद हजार मते घेऊन.पांच वर्षे काहीच काम केले नाही,शिवाय स्वताचा दारूचा व्यवसाय.तरीही दुसऱ्यांदा एक लाख तीस हजार मतांनी निवडून आला.आता तोच उमेदवार तिसऱ्यांदा दोन लाख मतांनी निवडून येईल.कारण स्वताच्या पक्षाचे एक लाख मतदार आहेतच.एक लाख सहज खरेदी करू शकतात.जळगांव शहरातील बुद्धिष्ट सभांचा आर्थिक भार,बली प्रतिपदाचा खर्च,शिव जयंतीचा खर्च हेच आमदार करतात.जळगांव शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर वकील , कलाकार मंडळी सुद्धा यांचे आश्रित आहेत.आणि हेच लोक रस्ता बनवला नाही म्हणून पेपरमधे बातमी देतात.स्थानिक वर्तमान पत्र सुद्धा हेच हाताळतात.जळगांवमधील काही अर्धवेडे तर चक्क खड्ड्यात झाडे लावतात.काही पुर्ण वेडे तर खड्ड्यात रांगोळी काढून अगरबत्ती लावतात.हे कशाचे लक्षण आहे?पराभूत, निपचित, गलितगात्र, म्लान मानसिकतेचे.जळगांवला विद्यापीठ आहे.अगदी कुलगुरू सुध्दा या शापातून, पापातून मुक्त नाही.

बाबासाहेब पुरंदरे म्हणत कि, छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदयापुर्वी महाराष्ट्रात अशीच परिस्थिती होती.समाज गलितगात्र झाला होता.म्हणे दोन होनावर बायका मिळत असत.मराठे सरदार सुद्धा इकडे तिकडे नोकरी करीत असत.तरीही बाया माणसांच्या अब्रूचे रक्षण होत नसे.यावर उपाय शोधला छत्रपती शिवाजी महाराजांनी.म्हणे असे कोणाच्या पदरी सरदार नको.आपलेच राज्य हवे.स्वताचे नियंत्रण असणारे राज्य हवे.स्वराज्य हवे.म्हणाले,मावळ्यांनो, शेतकऱ्यांनो तुम्हाला माया बहिणींची अब्रू वाचवायची असेल तर स्वराज्य हा एकमेव पर्याय आहे.आणि मावळ्यांनी, शेतकऱ्यांनी मनावर घेतले.स्वराज्यासाठी घरची शिदोरी ,स्वताचा घोडा,स्वताची ढाल तलवार घेऊन लढायला तयार झाले.म्हणे आम्हाला छत्रपतींकडून पगार सुद्धा नको.फक्त हवे संरक्षण.आम्ही लढू.स्वराज्यासाठी,अब्रूसाठी.महाराज, तुम्ही वयाने लहान असले तरी राजे व्हा.आम्ही वयाने मोठे असलो तरी तुमचे सैनिक होऊ.

हिच स्थिती,हिच परिस्थिती आज जळगाव शहराची झालेली आहे.जळगांव खड्डेमय झाले आहे.चोरी, गुन्हेगारी वाढली आहे.जळगावच्या अब्रूची लक्तरे आमदार विधानसभेत टराटरा फाडत आहेत.जळगांव म्हणजे सेक्स रैकेट.जळगांव म्हणजे सेक्स स्कैंडल.जळगांव म्हणजे आमदार खासदार ची सेक्सी सीडी.जळगांव म्हणजे आमदारांचे अजिंठा विश्रामगृहात चावट चाळे.जळगांव म्हणजे घरकुल घोटाळा.जळगांव म्हणजे बीएचआर घोटाळा.जळगांव म्हणजे दूध फेडरेशन चा घोटाळा.जळगांव म्हणजे जेडीसीसी चा नोट बदलीचा घोटाळा.चीड आणणारे आहे.हे थांबवणे आवश्यक आहे.कोण थांबवू शकतो?दारूवाला?सट्टा वाला?रेती वाला?चाकू सुरी वाला?छत्रपती शिवरायांनी तेव्हांची परिस्थिती बदलली.आज आपण ही परिस्थिती बदलवू शकतो.घरच्या भाकरी खाऊन या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे.शिवजयंती दारू पिऊन नाचण्यासाठी नसते.ती धडा घेण्यासाठी असते.आदर्श घेण्यासाठी असते.छत्रपतींचे अनुकरण करण्यासाठी असते.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव