निराधार,गरीब महिलांची भाऊबीज आनंदात साजरी

17

✒️सचिन सरतापे प्रतिनिध म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29ऑक्टोबर):-आज दहिवडी येथे निराधार व गरीब महिलांना दिवाळीच्या पूर्व संधेवर साडी व मुलांना वही पेन वाटप करण्यात आले या वेळी महिलांचा आनंद द्विगुणित झाला होता.मोबाई मूळ निवासी संघटना मुंबई व समय फौंडेशन गोंदवले यांचे संयुक्त विद्यमाने दहिवडी शहर व परिसराती 150 गरजू महिलांना साडी व 50 मुलांना वही पेन चे वाटप करून त्यांना भाऊबीज भेट देण्यात आली.

यावेळी मोबाई मूलनिवासी संघटनेचे प्रमुख प्रा. लूक मेंडीस म्हणाले ,गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली .निसर्ग माणसाला ज्ञान देतो ,जागृत करतो त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी पण आपली आहे जसे माणसांना मन आहे तसे निसर्गातील वनस्पतींना सुद्धा मन असते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देशी झाडांची लागवड केली पाहिजे व ती जपली पाहिजेत व चांगले आरोग्य राहणेसाठी सकस आहार घेतला पाहिजे .दुष्काळी भागातील महिलांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी आम्ही समय संस्थेच्या सहकार्याने प्रयत्न करू असे ते म्हणाले.

समय फाऊंडेशन चे प्रमुख व माजी सभापती बाळासाहेब रणपिसे यांनी सांगितले की ,महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी महिलांनी संघटित राहावे संविधानाने दिलेले हक्क अधिकार जाणून घ्यावेत व ते मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत तरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल ,धाडस वाढेल .

यावेळी माणदेश जिल्हा निर्मिती चळवळीचे प्रणेते प्रा.सचिन बनसोडे ,वळई चे माजी सरपंच बजरंग वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष युवराज भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास समय फाउंडेशनच्या सौ भारती पवार,मिनाज शेख,वंदनाताई कुंभार उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पत्रकार-संतोष घाडगे,पोपट खरात,संजय खरात,आबा बनसोडे,मोगराळे येथील उपसरपंच अमोल भोसले,किरण भोसले,मिलिंद भोसले,कबीर बनसोडे,दीपक वाघमारे,विक्रम जगताप,प्रताप पारसे,राजेंद्र आवटे आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.