राजगृहावर हल्ला म्हणजे पुरोगामी विचारावर हल्ला-अजय मगर

13

🔺सावता सेना युवक आघाडीचे प्रदेश महासचिव अजय मगर यांचे प्रतिपादन

✒️हिंगोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हिंगोली(9 जुलै):-भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथिल ‘राजगृह’ या ऐतिहासिक अशा निवासस्थानावर जो माथेफिरुंनी भ्याड हाल्ला केला तो निषेर्धाय आहे.हा हाल्ला म्हणजे राजगृह वर हाल्ला नसून पुरोगामी विचारावर आंबेडकरी अनुयांयीच्या अस्मितेवर हा हाल्ला झाला आहे.अशा भ्याड हाल्ल्यामूळे बाबासाहेबांचा विचार कदापिही पुसला जाणार नाही किंवा हा विचार थांबला जाणार नाही.हा हाल्ला करणारे एकतर लहान विचारांचे असतील किंवा जातीय तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा डाव असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे.

त्यामूळे या राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री मा अनिलजी देशमुख साहेब यांनी लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी सावता सेनेतर्फे सरकारकडे करत आहे.असे मत सावता सेना युवक आघाडीचे प्रदेश महासचिव अजय मगर यांनी व्यक्त केले