नाभिक समाज संघटनेतर्फे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न

16

🔹समाजाच्या उन्नतीसाठी श्री संत नगाजी महाराजांचे विचार अंगीकारावे – विवेक बोढे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.29ऑक्टोबर):-घुग्घुस येथील नाभिक समाज संघटनेतर्फे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन शनिवार २९ ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान येथे करण्यात आले.

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी श्री संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष किशोर नागतुरे, उपाध्यक्ष भानुदास अतकारे, सचिव गणेश घुमे, सहसचिव दशरथ चौधरी, कोषाध्यक्ष मनोज नागतुरे, संघटक पंकज लांडगे, सहसंघटक विठ्ठल अतकारे व सुधाकर जुनारकर, भाजपाचे राजेश मोरपाका उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकांनी श्री संत नगाजी महाराजांचे विचार अंगीकारावे. महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. संतांच्या विचारमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे.

भजनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.