भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहाभागाचा निर्धार !

22

🔹गंगाखेड कॉंग्रेसची बैठक 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29ऑक्टोबर):-कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा येत्या ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे या यात्रेचे प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून जोरदार स्वागत केले जाणार आहे. या यात्रेच्या स्वागत आणि सहभागासाठी गंगाखेड तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जय्यत तयारी केली जात असून या अनुषंगाने आज एक महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.

जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड हनुमंत जाधव, हाजी गफार शेख यांची प्रमुख ऊपस्थिती होती. तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, सुशांत चौधरी यांनी गंगाखेड शहर आणि तालुक्यातील नियोजन मांडले. तालुका आणि शहरात विविध माध्यमांतून जनजागृती करत या पद यात्रेचा ऊद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच किमान १०० वाहनांतून कार्यकर्ते, पदाधिकारी यात्रेसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस माजी नगरसेवक नितीन चौधरी, प्रमोद मस्के, दशरथ काळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सिद्धोधन भालेराव, अ. जा. विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, तालुकाध्यक्ष रामेश्वर गायकवाड, कॉंग्रेस तालुका ऊपाध्यक्ष दत्तराव भिसे, सदाशीवराव कुंडगीर, युवक जिल्हा ऊपाध्यक्ष नागेश डमरे, शेख नसीर, निलेश टोंपे, बीबन खान पठाण, सुग्रीव पैठणे, शेख अज्जू, शिवाजी घोबाळे, अमानुल्ला काका आदिंसह कॉंग्रस पदाधिकारी, कार्यकर्ते ऊपस्थित होते.