🔸राहुल गांधी विचार मंच ची मागणी

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(9 जुलै):-कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी आणि हे संकट हद्दपार करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये लॉक डाऊन आहे.
या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारे जनतेच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतले आहेत .आपल्या सरकारने लॉक डाऊन कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांच्या विजबिलातील स्थिर आकार पुढील 3 महिन्यासाठी स्थगित करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
राज्यात जनता कपर्यूनंतर लाँकडाउन करावा लागल्याने सर्वे उद्योग धंदे,व्यापार बंद झालेल्या आहेत.यामुळे राज्यातील शेतमजूर,बांधकाम कामगार, नोकरदार वर्ग, कर्मचारी, छोटे व्यापारी, सर्वाचा जगण्याचा प्रश्न आला आहे. राज्यातील कोरोना लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी राहुल गांधी विचार मंच जिल्हा अध्यक्ष प्रवीण जीवतोडे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील गरीब जनतेला 100 युनिट पर्यंत मोफत विजय देण्याची योजना आपण आखली होती. परंतु काही तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे ती तात्काळ लागू होऊ शकली नाही. भविष्यात आपण या योजनेची अंमलबजावणी राज्यात कराल या बद्दल तिळमात्र शंका नाही.

महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी, आज हातावर पोट असलेल्या गोर गरीब सामान्य माणसांच्या समोर प्रचंड अडचणी आहेत दररोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची ताकद सुद्धा सर्वसामान्य माणसाजवळ राहली नाही . अशा परिस्थितीमध्ये लोकडाऊन च्या कालावधीतील घरघुती विज बिल भरणे त्यांना अशक्य आहे.
लॉक डाऊन कालावधीत 3 महिन्याचे संपुर्ण घरघुती विजबिल माफ करून राज्यातील गरीब जनतेस दिलासा देत वीज बिल माफ करण्याची मागणी करीत प्रविन जिवतोडे राहुल गांधी विचारमंच चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष यांनी राज्याचे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत. आणी मुख्यमंत्री.उध्दवजी साहेब ठाकरे यांच्या ई-मेलद्वारा पाठविलेल्या निवेदनातुन केलेली आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED