

✒️अनिल साळवे((गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.29ऑक्टोबर);-केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातील पालक सुध्दा शिक्षणाच्या बाबतीत जागृत झाले आहेत. आपणांस जे शिक्षण मिळाले नाही, ते आपल्या मुलांना मिळावे यासाठी पालक जीवाचे रान करीत आहेत. परिणामी सरकारी शाळेतून मुलांची पट संख्या कमी होत आहे. तसेच खाजगी शाळेत आपल्या मुलांना शिकवणे प्रतिष्ठेचे समजले जात आहे. त्यामुळे सरकारी शाळेत पट संख्या टिकवून ठेवणं फारचं आव्हानात्मक होत आहे. तसेच सरकारी शाळेच्या बाबतील नकारात्मता सुध्दा वाढत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. म्हणून सरकारी शाळांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली तरच येणारा काळ सुखकर ठरेल, असे परखड मत गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.
इसाद येथील निजामकालीन जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान अंतर्गत स्थानिक आमदार व जिल्हा परिषद निधीतून बांधण्यात येत असलेल्या चार वर्गखोल्यांच्या भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच उध्दवराव सातपुते, माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, श्रीकांत सातपुते मित्रमंडळ जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, प्रभारी हनुमंत मुंढे, माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, मित्रमंडळ तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, गंगाखेड शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, माजी सभापती मगर पोले, मुंजाराम मुंडे, माजी पं.स.नितीन बडे, माजी सरपंच भगवानराव दादा सातपुते, सर्जेराव सातपुते, पोलिस पाटील अशोकराव भोसले, प्राचार्य रंगराव सुप्पेकर, प्रा.भगवान भोसले, मुख्याध्यापक रामकिशन लटपटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर सातपुते, उपाध्यक्ष उत्तम भोसले होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, पत्र्याच्या शेडमध्ये भरणारी सरकारी शाळा आता पूर्वी सारखी राहिली नाही. आधुनिक काळात सरकारी शाळांसाठी सुध्दा चांगल्या पायाभुत सुविधा निर्माण होत आहे. संगणकापासून ते गणिती पेटीपर्यत जिल्हा परिषद शाळांनी चांगली प्रगती केली आहे. मात्र, तरीही लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यात यंत्रणा काही ठिकाणी कमी पडत आहेत. परंतु जिल्हा परिषद शाळांनीचं समाजातल्या चांगल्या पिढ्या घडवल्या आहेत. अगदी आज इंग्रजी शाळांना भरमसाठ फी भरणारा पालक सुध्दा मराठी शाळेतूनच सक्षम झाला आहे. त्यामुळे सरकारी शाळांनी नवी जिद्द आणि उर्मी घेवून काम करायला हवं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामकिशन लटपटे यांनी केले. तर सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते आणि आभार रामेश्वर सातपुते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास उत्तम भोसले, भोजराव नाना सातपुते, इंजि बोमडे साहेब, शिवाजीराव मुंडे, बाबासाहेब भोसले, भानुदास भोसले, बाबुराव सातपुते, बालासाहेब किशनराव भोसले, सुदर्शन भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.