करण तायडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक दिवस अन्नत्याग!

15

🔹पावसामुळे शेतकऱ्याची दिवाळी कमी दिवाळ निघाल..!

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.30ऑक्टोबर):-शेतकऱ्यांची अवस्था अशी झालीय की कुणाकडे बोलताही येईना आणी उघडपणे रडताही येईना, कारण चारही बाजूने शेतकऱ्याची जणु चेष्टाच सुरू आहे.ऑक्टोंबर संपत आलाय पण अजूनही पाऊस थांबायचं नाव नाही,कुणाचं सोयाबीन सोंगायच बाकी आहे, तर कुणाचं सोंगुण गंजी मारून ठेवलीय पण काढायचं बाकी आहे तर कुठे सोयाबीन काढून पोते भरून तयार आहे पण शेतात कुठलंही वाहन जाईल अशी सध्यातरी परिस्थिती नाही.ज्यांनी हालअपेष्टा सहन करत पीक मार्केटला नेलं तर तिथेही पिकाला भाव नाही(हमीभाव फक्त कागदावर आहे).

म्हणून यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात आणि पिकविम्यासाठी हेलपाटे मारण्यातच जाईल अशी परिस्थिती आहे, एकीकडे अशी भयाण परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे ज्यांनी शेतकऱ्यांचं फक्त भांडवल केलं आणि निवडून आलेत, त्यांच्याकडे शेतकरी मोठ्या अपेक्षेने बघत आहेत की ‘ हे आपले प्रश्न सोडवतील’ पण ते फक्त स्वतःचे प्रश्न सोडवण्यात,आणी अंतर्गत राजकारणात मग्न आहेत.

ज्यांनी ही अवस्था सरकारपुढे मांडावी ती ‘मीडिया’ राजकीय पक्षाची भाट झालेली आहे…, जे स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजतात(काही अपवाद वगळता), शेतकरी पुत्र संबोधतात,समाजसुधारक म्हणवून घेतात, असे वक्ते,लेखक हे राजकीय पक्षाचे गुलाम झालेले आहेत. अश्या नाकर्त्यांकडून अपेक्षा ठेवणेही व्यर्थ आहे म्हणून आता शेतकऱ्यांनाच पुढं यावं लागेल,स्वतःचे मार्ग स्वतः शोधावे लागतील. आता बोलावं लागेल,लिहावं लागेल आणि वेळ पडली तर झगडावं लागेल.
कुटुंबाला आनंद द्यावा, मुलाबाळांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा असते परंतु परिस्थिती पुढे ते हातबल झालेले असतात.

त्यांच्या सन्मानासाठी आपण उभ राहिले पाहिजे, पर्यायी आपल्याला एकदिवसीय अन्नत्याग करावा लागेल, पावसानं सगळं शिवार झोडपून टाकलेला असताना अद्याप ओला दुष्काळ जाहीर झाला नाही, म्हणून ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. त्यासाठी ‘ करण तायडे ‘ यांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने एक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून एक दिवसीय मोहीम राबवली होती, एक दिवस आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी उभं राहून. जिथे असू तिथून आपापल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या घरात उजेड पेरण्याचे काम केले, ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले व राहत्या घरी ‘ एकदिवसीय अन्नत्याग करुन ‘ शेतकऱ्यांना दिलासा देऊन.. शेतकरी शेताच्या बांधावर ३६५दिवस राब-राब-राबून कबाळ-कष्ट करून अन्न पिकवतो, म्हणून एक दिवस जेवण न करता/फराळाचे न खाता एकदिवस त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण भांडू शकतो, एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपाशी राहू शकतो. आपण एवढे तर नक्कीच करू शकतो.

आपण सर्व महाराष्ट्र भरातून एकदिवस अन्नत्याग करुन सरकारने लवकरात लवकर ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा यासाठी प्रयत्न करु शकतो असे सांगून सोशल मिडियावर महाराष्ट्र भर व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला.