✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
सातारा(दि.30ऑक्टोबर):-रयत शिक्षण संस्था, सातारा* येथे नुकताच *इन्फोसिस फौंडेशनच्या* अध्यक्षा सौ. सुधा मुर्ती यांचा नुकताच *रुपये २.५ लाखाचा* लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सौ. सुधा मुर्तींनी त्याची परतफेड म्हणुन *रु १० लाखाची* देणगी रयत शिक्षण संस्थेला अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली हा झाला मनाचा मोठेपणा….. पण सौ. सुधा मुर्ती यांच्या बाबतची आश्चर्यकारक माहीती तुम्हाला माहीत आहे हे का ?
सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा *१०,००० कोटी* चा व्याप असलेल्या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा असुन दरवर्षी त्या १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून दान करतात. तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा *खास कटाक्ष असतो… सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात त्या साड्या कमी किंमतीच्या असतात.*
पर्स २०० ते ४०० रुपयाची असते. मनगटी घड्याळ वेळ बघता आली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही साधे सुधे ८००—९०० रुपयाचे असते. मोबाईल ७ ते ८ हजाराचा.
फेसबुक, व्हाटसअप मध्ये १५—१५ दिवस लक्ष घालत नाही. पायातील चप्पल सुध्दा महागडी नसते. कोणत्याही ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही. घरातील सर्व कामे स्वत:च करतात. नातेवाईक व मित्रपरिवार यांचे घरातील सर्व लग्न व दु:खद प्रसंगी हजर राहतात.
*लाख- दिड लाख महीना कमवणार्या माणसांच्या बायका एखाद्या लग्नात अंगावर दागिने , महागड्या साड्या घालून इतरांना तुच्छ लेखत हाय-फाय राहणीमानात स्वत:ला मिरवत असतात पण सौ. सुधा मुर्तींचा तिथे प्रवेश झाल्यावर* तेथील अहंकारी नजरा क्षणार्धात लाजेने खाली झुकतात..
*हजारो कोटीची सम्राज्ञी* असलेल्या *सुधा मुर्तींचा* साध्या राहणीमानातला तेथील वावर सर्वांना *अचंबित* करुन सोडतो, आपण कोण आहे हे विसरुन *इतरांना मोठेपणा* देत ही बाई जेव्हा सर्वांची स्वत:हून पुढे जाऊन आस्थेने चौकशी करु लागते तेव्हा *मी मी म्हणणार्यांचा अहंकार क्षणार्धात गळून पडतो..*