मारोडा गावातील युवकांनी घेतला वृक्ष संवर्धनाचा वसा!

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.30ऑक्टोबर): – राजकीय ,सामाजिक स्तरावर वृक्षारोपण कार्य होत असतात.मात्र वृक्षारोपणानंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे फक्त कार्यक्रम होतात, पण त्यांची निगा राखल्या जात नाही. ही बाब लक्षात घेऊन मारोडा गावातील युवकांनी पुढे येत वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे, ही संकल्पना हाती घेऊन जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी यांच्या सहकार्याने तसेच रोशन कोहळे ग्रा. पं सदस्य मारोडा यांच्या पुढाकाराने गावात झालेल्या वृक्षाजवळील केरकचरा काढून वृक्षांना कुंपण केले. इतकेच नाही तर प्रत्येक युवकांनी आपापले वृक्ष दत्तक घेतली व त्यांना मोठे करण्याचे सर्वश्री जबाबदारी युवकांनी हाती घेतली आहे.

यामध्ये श्री तालापल्लीवार सर मुख्याध्यापक जि. प. हायस्कूल चामोर्शी तथा शिक्षक वृंद, भास्कर मोहूर्ले ,पुनीत बारसागडे ,रितेश पिपरे, वेदांत मोहूर्ले, विनीत मोहूर्ले, अविनाश ठाकरे, देवेंद्र पिपरे, गौरव सोनुले, विवेक ठाकरे, गणेश चलाख, विक्रम चौधरी, हंसराज मोहूर्ले, कुलदीप निकोडे ,आदित्य आदे सह गावातील अनेक युवक या कार्यक्रमात सहभागी झाले.या उपक्रमात गावातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन रोशन कोहळे ग्राम.पं. सदस्य मारोडा यांनी केले..