शिक्षण क्षेत्रातील ‘हिरकणी’ आदर्श शिक्षिका सौ. बबीताताई बोडखे

56

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ. सरस्वती लाड)

आष्टी(दि.30ऑक्टोबर):-ज्या राष्ट्रात महिलांचा मानसन्मान राखला जातो त्या देशाची प्रगती अव्यहातपणे सातत्यपूर्ण वृद्धिंगत होते. हा जगातला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या राष्ट्रपुरुष, महात्म्यांनी भारताची भूमी पवित्र केली. माणूस घडवण्यासाठी संस्काराच्या माध्यमातून शांत, संयमी, उदात्त हेतूने ऐक्य, बंधुत्व आणि एकतेचा विचार समाजासमोर ठेवला. त्यांच्याच विचार कार्यांची समृद्ध परंपरा जपण्यासाठी आपल्या माध्यमातूनही आजही अनेक जण खारीचा वाटा उचलताना दिसतात. यामध्ये बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आदर्श शिक्षिका बबीताताई उत्तमराव बोडखे यांचा नामोल्लेख करणे क्रम प्राप्त ठरेल!

महाराष्ट्राच्या आद्य महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून नवी क्रांती घडवली. त्यांच्याच वाटेवर आज ‘चूल आणि मूल’ हा जुना नियम मोडून शिक्षणाचा क्रांतिकारी इतिहास आजच्या महिलांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्याच विचार कार्यास स्मरून आष्टी येथील सौ. बबीताताई बोडखे यांनी एम. ए., बी. पीएड. हे उच्च शिक्षण घेऊन ज्ञान मंदिरात नोकरी अर्थात शिक्षकीपेक्षा स्वीकारला. आष्टी तालुक्यातील क-हेवाडी येथील हरिनारायणस्वामी विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, संस्कार आणि राष्ट्रप्रेम, माणुसकी या मूल्यांचा स्वीकार करण्याचा मनोमन सल्ला दिला. वृक्षारोपण, स्वच्छता, वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर, गुरुजनांचा आदर करण्याची शिकवण आदीसह शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवले.

या त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक जिल्हा विभागीय आणि राज्य पुरस्काराने आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. पती पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे यांची साथ त्यांना सदैव लाभली. त्यांची कन्या डाॕ. शिवानी ही एमबीबीएस हे उच्च शिक्षण घेतेय. इंजि. राकेश हा आयटी क्षेत्रात अभियंता आहे तर दत्ताभाऊ बोडखे याने सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण केलेले आहे.

प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे, प्रत्येक स्त्री धाडसी, हिंमतवान बनली पाहिजे, ती सामर्थ्यवान बनली पाहिजे हे समाजातील प्रत्येक घटकांनी ठरवले पाहिजे. तिला फक्त सामाजिक, राजकीय व नौकारीतच फक्त आरक्षण नको तर तिला खरे मानसिक आरक्षण मिळाले पाहिजे तरच ती सन्मानाने पुढे जाईल. तिच्याबरोबर देश, समाज व तिचे कुटुंब ही सक्षम होतील..

स्त्री म्हणजे जन्माला आलेले एक मौल्यवान रत्न आहे. ते काळजीपूर्वक सांभाळण्याची गरज आहे. समाजात शेवटी चांगले व वाईट हे दोन घटक असतात. कुठलीही गोष्ट, विचार एकदम बदलत नाही पण त्यादृष्टीने टाकलेले, त्या दिशेने टाकलेले एक पाऊल फार महत्त्वाचे असते. शेवटी समाजाची सुरुवात स्वतःपासून होते. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी स्वाभिमानाचा लढा लढला पाहिजे. या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक जीवन जगणाऱ्या अध्यात्मिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. बबिताताई उत्तमराव बोडखे आहेत. त्यांचा आज ५० वा.वाढदिवस….
महिला या शब्दाबरोबर प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. त्याचबरोबर सर्वशक्तिमान स्त्री समोर उभा राहते, स्त्री मध्ये एक शक्ती आहे. तीची शक्ती तारक, प्रेरक व मारक या तिन्हीत एकवटलेली आहे, तिच्यात असलेल्या सजकता, चाणाक्षपणा व प्रसंगावधानपणा या उपजत असलेल्या गुणांचा उपयोग करून ती या शक्तीचा समयसूचकतेने योग्य वापर करते, आपण इतिहासाच्या पानात डोकावलं किंवा वर्तमानात जरी तपासलं तर स्त्री ही सर्व समाजघटकांना मार्गदर्शन करणारी ठरली आहे किंबहुना प्रत्येयकाचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणारी स्त्रीच असते

आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे, प्रत्येक कामातवहिरहिरींने भाग घेत आहे, नवनवीन क्षेत्र पादाक्रांत करीत आहे, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहे, स्त्री पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करते आहे. ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे यांंच्या पत्नी उच्चशिक्षित असुन पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात सहशिक्षका म्हणुन कार्यरत आहेत. शिक्षण, संस्कृती, धर्म ,स्त्री – पुरुष समानता बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, वैचारिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी म्हणून काम करताना दिसतात. भविष्यात सावित्रीबाई फुले यांचा विचार पुढे नेण्यासाठी गुणवंत अध्यापिका सौ. बबीताताई बोडखे यांना अभिष्टचिंतन दिनानिमित्ताने खूप खुप शुभेच्छा..!!!
प्रा. सौ. आशा चाटे – फड