अखिल भारतीय यादव महासभा युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सुरज यादव

17

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.31ऑक्टोबर):- सतीफैल येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ता सुरज शिवमुरत यादव यांच्या गौ-सेवा जनसेवा कार्य यशवंत यादव यांनी अखिल भारतीय यादव महासभा युवा राष्ट्रीय अध्यक्ष शैलेन्द्र यादव यांच्या पर्यंत पोहचवुन दिले.

सुरज यादव यांची अखिल भारतीय यादव महासभा महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्षपदी नियुक्ती करन्यात आली व तसेच संघटनेची कार्यकारीनी लवकरात लवकर गठित होईल असा विश्वास वरिष्ठ पदाधिकारी यांनी दर्शविली सुरज यादव यांची नियुक्ती झाल्याने त्याच्यावर सर्वत्र स्तरारून अभिनंदानाचा वर्षाव होत आहे