छठ पूजा समिती घुग्घुसतर्फे छठ पूजेचे आयोजन

41

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.31ऑक्टोबर):- घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथील वर्धा नदीच्या काठावर छठ पूजा समिती घुग्घुसतर्फे रविवारी व सोमवारी मोठया उत्साहात छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन छठ पूजा समिती घुग्घुसतर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्तर भारतीय बांधवांच्या कुटुंबियांनी संख्येत भाग घेतला.

याप्रसंगी सर्वांनी उगवत्या सूर्याला व मावळत्या सूर्याला अर्घ्य दिला व आपल्या कुटुंबात सुख शांती राहावी यासाठी प्रार्थना केली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिप सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, छठ पूजा समितीचे रत्नेश सिंग, डॉ. सुनील राम , रवीश सिंग, कृष्णा शाह, अजय सहानी, मानस सिंग, श्रीकांत पटेल, रामजी सिंग, राजकुमार सिंग, अमित सिंग, अभिजित सिंग, सतीश सिंग, बाबू शर्मा, सुरज सिंग,शंकर सिद्धम व मोठया संख्येत समाज बांधव उपस्थित होते.