वाघाचा बंदोबस्त करा निवेदनातून मागणी

20

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.1नोव्हेंबर):-वेकोली वणी क्षेत्राच्या पैनगंगा खदान, कोलगाव, माथोली, कैलाशनगर येथे वाघाचा मुक्त संचार असल्यामुळे या ठिकाणच्या कामगार वर्गात व गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनांक 30.10.2022 ला सायंकाळी 7.15 वाजता दरम्यान कैलाशनगर मायनर क्वार्टर समोर असलेल्या माथोली येथील एका युवकाच्या गाईवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. तर माथोली येथील एका गोठ्यात असलेल्या बकऱ्यावर हल्ला करून तीन बकऱ्या खाऊन टाकल्या तर काही बकऱ्या जखमी असल्याची चर्चा आहे. माथोली, जुगाद, कैलाशनगर, येथे वाघाचा मुक्त संचार वाढल्याने व या गावातील नागरिकांना शेतीसाठी व कामावर तीन पाळीत रात्रौ -दिवस जावे लागत असल्यामुळे या वाघा पासून संरक्षण मिळावे यासाठी माथोलीचे सरपंच सौ.ज्योतीताई माथुलकर यांनी वनविभागाचे अधिकारी यांचेशी भ्रमंनध्वनी वरून चर्चा केली व त्यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले.

दिनांक 31.10.2022 ला वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला तर डॉ. सचिन राजगडकर यांनी गाईवर उपचार करून बकऱ्याची सुद्धा तपासणी करण्यात आली.व वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाचे अधिकारी यांना माथोली ग्रामपंचायत सरपंच्या सौ.ज्योतीताई सुनील माथूलकर, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा देवाळकर,मनिषा उरकुडे, कुणाल डोये यांनी निवेदनातून केली यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते