

🔸बॅनर चोरणारी व फाडणारी टोळी सक्रिय; भागवत चौधरी
🔹शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमाताई अंधारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे यासंदर्भात फलक लावण्यात आलेले होता. मात्र, येथील फलक चोरीस गेल्याची घटना घडली आहे
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)
धरणगाव(दि.1नोव्हेंबर):- तालुक्यातील पाळधी गावात शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमीत्त व युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांची जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याच्या समर्थनार्थ तसेच महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरूवात झाल्यानिमित्त आज दि.१ नोव्हें, मंगळवार रोजी धरणगाव शहरात शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पाळधी गावात फळक लावण्यात आले होते. तरी पाळधी गावातील फलक चोरीस गेल्याची घटना घडली आहे. अश्याच प्रकारे गेल्या महिन्यात शिव संवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे हे धरणगावी आले होते त्यावेळेसही फलक फाडण्याचा प्रकार घडला होता. या घडलेल्या प्रकारामुळे वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे ‘ पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त दि.१ नोव्हेंबर, सायं. ६ वाजता धरणगावात येत आहेत. या आधीच काल रोजी त्यांच्या यात्रेची माहिती देणारा फलकच कुणी तरी अज्ञाताने चोरून नेल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाळधी दूरक्षेत्र गाठून तक्रार दिली. यावेळी फलक कोणी चोरला? आपला कोणावर संशय आहे असे नगरसेवक भागवत चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमचा कोणावरही संशय नाही. परंतु, *”सद्या बॅनर चोरणारी व फाडणारी टोळी सक्रिय झाली आहे.”* त्याचप्रमाणे ” उद्धव बाळासाहेब ठाकरे ” मूळ शिवसेना व सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आमिष व नानाविध प्रलोभन दाखवून व फोन करून आमच्या गटात – संघटनेत या अशी बळजबरी केली जात आहे. म्हणून विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणूनच सद्याची राजकिय परिस्थिती पाहता *”राजाला कुणी नागडे म्हणू नये.”* असंही असू शकतं.! असे श्री. चौधरी म्हणाले.
याप्रसंगी पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी व समस्त शिवसैनिकांनी या प्रकरणाचा निषेध केला. निवेदन सादर प्रसंगी सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शहरप्रमुख भागवत चौधरी, धिरेंद्र पुरभे, पं.स.सभापती दिपक सोनवणे, जेष्ठ शिवसैनिक राजेंद्र ठाकरे, नगरसेवक जितेंद्र न्हायदे, उप शहर प्रमूख गोपाळ माळी, विभाग प्रमुख बापू महाजन, संघटक प्रेमराज चौधरी, गोपाळ पाटील, राहुल रोकडे आदी उपस्थित होते. तर पाळधी दूरक्षेत्राचे सपोनि गणेश बुवा यांनी सदर प्रकरणातील चौकशी करून तपास केला जाईल अशी ग्वाही दिली आहे.