✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर (9 जुलै)-भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथिल ‘राजगृह’ या ऐतिहासिक अशा निवासस्थानावर जो माथेफिरुंनी भ्याड हल्ला केला तो निषेधार्थ प्रकारआहे.हा हल्ला म्हणजे राजगृह वर हल्ला नसून पुरोगामी विचारावर आंबेडकरी अनुयांयीच्या अस्मितेवर हा हल्ला झाला आहे.अशा भ्याड हल्ल्यामूळे बाबासाहेबांचा विचार कदापिही पुसला जाणार नाही किंवा हा विचार थांबला जाणार नाही.हा हाल्ला करणारे एकतर लहान विचारांचे असतील किंवा जातीय तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा डाव असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे.त्यामूळे या राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री मा अनिलजी देशमुख यांनी लक्ष घालून दोषींना अटक करण्यात यावी अशी मागणी चिमूर तालुका वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उप विभागीय अधिकारी चिमूर याना सादर करण्यात आलेल्या निवेदनात या हल्ल्याच्या खरा सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,आंबेडकरी चळवळीत या घटनेचा आक्रोश निर्माण होण्याचे अगोदर आरोपींना अटक करण्यात यावी, अश्या अनेक मागण्या करण्यात आल्या.
निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे, विनोद सोरदे, ज्ञानेश्वर नागदेवते, शैलेश गायकवाड, भाग्यवान नंदेस्वर,शैलेशचंद्र श्रीरामे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED