तळोधी (नाईक) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव

18

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.1नोव्हेंबर):-श्री गुरुदेव सेवा मंडळ तळोधी (नाईक) येथे १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमानिशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथीचे आयोजन केले आहे. दिनांक १२ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता रामभाऊ वाकडे, मोरे, मधुकर वांढरे, गोपाल कावरे यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात येईल.

दिनांक १३ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता महिलांकरीता रांगोळी स्पर्धा व हळदीकुंकु मेळावा, दुपारी १२ वाजता किटाळी, टेकेपार, चिमूर येथील भजन मंडळीचे भजन, सायं. ६.१५ वाजता भक्तदास जिवतोडे यांचे सामुदायीक प्रार्थनेवर मार्गदर्शन करणार आहेत. रात्री ८.३० वाजता ह.भ.प. गोपाल बोरसरे महाराजांचे किर्तनाचा कार्यक्रम होईल.

दिनांक १४ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता गोपालकाल्याचे महत्वावर केवलदास महाराज, मुख्याध्यापक भक्तदास जिवतोडे, मुख्याध्यापक एन. एम. निखाडे, सरपंच मदनपाल येसांबरे, उपसरपंच प्रकाश धानोरकर, मुख्याध्यापिका हिवरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर ह.भ.प. गोपाल बोरसरे महाराजांचे किर्तन होईल.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसर्वाधिकारी निलकंठ सुर्यवंशी, उपसर्वाधिकारी आशिष कावरे, सचिव उमदेव गजभे, सहसचिव बंडु गिरी, कोषाध्यक्ष सुनिल खाटे, संघटक अभिषेक सूर्यवंशी, प्रचार प्रमुख सचिन वाकडे, सदस्य लिकेश धानोरकर, दुर्योधन वाटे, सुरज राउत, प्रथमेश श्रीरामे, भगवान गजभे, रामभाऊ वाकडे, नाना गजभे, नंदकिशोर मडावी, सुमन श्रीरामे, लिला रणदिवे, रोशनी शेंडे, धनराज डांगे, वासुदेव शेंदरे, नथ्यु सुर्यवंशी आदीने केले.