माण चा अभिमान अमर शिंदे ; पट्टी- एका वर्षात ठरला कलाक्षेत्रातील दहा पुरस्कारांचा मानकरी

12

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9975686100

माण तालुक्यासारख्या दुष्काळी भागत राहून आज पर्यंत अनेक लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.असेच नावलौकिक मिळवले आहे पिंगळी गावचे युवा दिग्दर्शक अमर शिंदे यांनी. अतिशय खड़तर परिस्थितितून माण तालुक्यासारख्या भागात कलाक्षेत्रात एक वेगळी छाप सोडली आहे .

या भागात इथल्या कलाकाराना सोबत घेऊन ‘ एक अनोखी भेट , पाकळी , राखी , फ्रेंडशिप अशा अनेक प्रेरणादायक लघुपटांची निर्मिती केली . त्यांच्या या कामगिरी बद्दल पाकळी व राखी या दोन लघुपटाना कोल्हापुर , कोलकाता , बंगलोर , नागपुर , दिल्ली , रायपुर इ शहरातील संस्थाचे पुरस्कारा मिळाले .

तसेच बुलढाणा फ़िल्म सोसायटी यांचा राष्ट्रीय कलागौराव पुरस्कार ही मिळाला आहे . असे एकाच वर्षात तब्बल दहा पुरस्कार मिळाल्याने ते खऱ्या अर्थाने ‘माण चा अभिमान’ ठरले आहेत. माण तालुक्यातील कला क्षेत्रात मिळणारे आजपर्यंत चे सर्वाधिक पुरस्कार आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.