डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान “राजगृह”,मुंबई यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

26

✒️पोंभुर्णा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

🔺वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

पोंभुर्णा(9 जुलै):-  संपूर्ण देशाचे श्रध्दास्थान व प्रेरणादायी वास्तु असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी राजगृह वर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पोंभुर्णा वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
विश्वरत्न,बोधिसत्व,घटनातज्ञ, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले आणि पूर्वीचे पुस्तकांसाठी बांधलेले “राजगृहावर” दि.07/07/2020 ला संध्याकाळी 5.30 वाजता दोन अज्ञात माथेफिरू व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली.यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत.यात घरातील कुंड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.त्या भ्याड हल्ल्याचा पोंभुर्णा वंचित बहुजन आघाडी कडून तीव्र जाहीर निषेध करत.”राजगृहावर”हल्ला केलेल्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावे .या हल्ल्यामागील कळसूत्री,सूळबुद्धीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावे .आंबेडकरी जनतेचा आक्रोश होण्यापूर्वी माथेफिरुंना अटक करा.”राजगृहाला”व आंबेडकर कुटुंबियांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्या.या पुढे जनतेच्या श्रद्धास्थान असलेल्या वास्तूंवर हल्ला होणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी.ईत्यादि मागण्या निवेदनात करण्यात आल्या या मागणीचे येत्या 7 दिवसात पूर्ण कराव्यात,,अन्यथा रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही निवेदनातून करण्यात आला जर कोणताही अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना चंद्रहास उराडे तालुका अध्यक्ष,श्यामकुमार गेडाम जिल्हा सदस्य, अतुल वाकडे तालुका युवा अध्यक्ष,मायाताई मुन महिला तालुका अध्यक्ष,रविभाऊ तेलसे तालुका महासचिव, अविनाश कुमार वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल चंद्रपूर,वंदेश तावाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .