जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे सत्यशोधक समाज संघाची जिल्हा बैठक संपन्न !

16

🔹११ डिसेंबर ला कुऱ्हे पानाचे येथे जिल्हास्तरीय सत्यशोधक परिषद घेणार – सत्यशोधक समाज संघ

🔸सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातुन सत्यशोधक समाज शत्कोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्ताने समाजोपयोगी कार्यक्रम महाराष्ट्रात राबविणार – सत्यशोधक अरविंद खैरनार

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.2नोव्हेंबर):- शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे दि. ३१ आक्टोबर, २०२२ सोमवार सत्यशोधक समाज संघाची जिल्हा कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न झाली. या सभेचे प्रास्ताविक सत्यशोधक लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात पाटील यांनी सत्यशोधक समाजाचे दोन वर्षाचा कार्याचा आढावा सांगितला व महाराष्ट्रात सत्यशोधक समाज संघ चे पुर्नजीवीत होऊन जोमाने काम करत आहे.

सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा बैठकीचे अध्यक्षस्थानी सत्यशोधक अरविंद खैरनार होते. सत्यशोधक डॉ.सुरेश झाल्टे व सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनोगतात आपली सभ्यता व आपली संस्कृती जोपासावी सत्यशोधक समाज संघाच्या प्रचार – प्रसार गावा-गावात झाला पाहिजे सत्यशोधक सभ्यता शिवाय मनुष्याचे कल्याण नाही. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांचे विचारच आपल्याला तारतील. इतिहासाचे गाढे अभ्यासक जयसिंग वाघ, मुकुंद सपकाळे, यांनी आपल्या मनोगत जळगाव मध्ये सत्यशोधक साहित्य संमेलन भरायला हवे. सत्यशोधक समाजाचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले होय. बहुजनांनी आपली ग्लानी झटकली पाहिजे व बहुजन महापुरुषांचे विचार तेवत ठेवणे हीच महापुरुषांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले.

यानंतर सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षानिमित्त घ्यावयाच्या विविध उपक्रम – चर्चा, जळगाव जिल्हा अधिवेशन, संचलन समिती तयार करणे, सत्यशोधक समाज संघ सभासद नोंदणी या विविध विषयांवर जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील सत्यशोधकांनी विस्तृत अशी चर्चा केली. व आपापला परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक अरविंद खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार व नाशिक येथे सत्यशोधक परिषद यशस्वीरित्या पार पाडल्या व महाराष्ट्रात सत्यशोधक समाज संघ उत्साहाने काम करत आहे. आपली व्यवस्था – आपली विधीकर्ते आपण निर्माण केले पाहिजे. यासाठी धरणगावला महाराष्ट्रातील पहिले विधीकर्ते शिबिर घेण्यात आले होते. सत्यशोधक समाज संघ वाढीसाठी प्रत्येक तालुक्यात निबंध, चित्रकला, रंगभरण, वकृत्व, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करून व पथनाट्य,जलसा, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, समाजोपयोगी कृतीयुक्त कार्यक्रमातून महापुरुषांचे विचार तेवत ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

या जिल्हा बैठकीला कुऱ्हे पानाचे गावाचे सरपंच प्रमोद उंबरकर, गोविंदा पवार, माजी मुख्याध्यापक धनराज मोतीराय सर, हरूण मन्सुरी, एच.डी.माळी सर, आबासाहेब राजेंद्र वाघ, विजय लुल्हे सर, कैलास जाधव, राजु जाधव, रमेश बोढरे, दिनेश महाजन, संजय वराडे, रवींद्र तितरे, कविराज पाटील, शिवदास महाजन,या बैठकीचे सूत्रसंचलन सत्यशोधक पुस्तक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष पी.डी.पाटील सर यांनी तर आभार आबासाहेब विश्वासराव पाटील यांनी मानले. जिल्हा बैठक यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.