प्रहारचे बापुसाहेब घोडके यांच्या पाठपुरावाला यश-बोराळेग्रामपंचायतीने अपंगाचा ५ टक्के निधी वाटप

27

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.2नोव्हेंबर):-बोराळे ग्रामपंचायतने सलग चार वर्षाची परंपरा अबाधित ठेवत सलग चौथ्या वर्षी पण बोराळे ग्रामपंचायत ने दिव्यांग बांधवांचा पाच टक्के राखीव निधी वाटप केला. दिव्यांगा चे युवा नेते बापूसाहेब घोडके यांच्या पाठपुराव्या मुळे व बोराळे गावचे लोकप्रिय सरपंच सुजाता पाटील तसेच कर्तव्यदक्ष ग्रामसेवक गोपीचंद गवळी या सर्वांच्या माध्यमातून सलग चार वर्षे वेळेत ग्रामपंचायतचा पाच टक्के अपंग निधी वाटप केला गेला.

बोराळे गावचे ग्रामपंचायतच्या सध्याच्या ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे तसेच ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांच्या देखरेखी खाली तसेच दिव्यांगाचे युवा नेते बापूसाहेब घोडके यांच्या पाठपुराव्यामुळे बोराळे गावचा पाच टक्के निधी वेळेत वाटला जात आहे. यावर्षीही तो निधी वेळेत वाटला गेला आहे. चेक दिव्यांगाकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच सुजाता पाटील, ग्रामसेवक गोपीचंद गवळी,उपसरपंच संतोष गणेशकर,ग्रामपंचायतचे सदस्य माधुरीताई नकाते, नीताताई घोडके,, मंगलताई पाटील, राणीताई कुंभार, महानंदा धनवे, चन्नविर लंगोटे, भारत पाटील, बोराळे चे युवा नेते सचिन नकाते आणि युवा नेते विनोद पाटील, बोराळे गावचे मा. सरपंच कुमार धनवे, पाणीपुरवठा विभागच्या हावळे मॅडम, त्याचबरोबर दिव्यांग बहुसंख्येने हजर होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बापूसाहेब घोडके यांनी ग्रामपंचायत च्या सरपंच, सर्व सदस्य आणी ग्रामसेवक या सगळ्यांचे आभार मानले.