महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी कोविडमुळे आई किंवा वडील यांचे निधन झालेल्या मुलांना वैद्यकीय शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला – हेरंब कुलकर्णी

23

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.2नोव्हेंबर): – महाराष्ट्र राज्यातील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलामुलींना वैद्यकीय शिक्षण मोफत देण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी घेतला आहे.कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मागिल वर्षेभराच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलामुलींना वैद्यकीय शिक्षण मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे असे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा स्त्री मृत्यू पावल्याने मुलामुलींना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वेळोवेळी कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांनी निदर्शनास आणून दिले होते. याच पाठपुराव्यामुळे वैद्यकीय शिक्षण मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे असे प्रतिपादन हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

या संदर्भात कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य चे राज्य निमंत्रक तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रातील कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने राज्यभरातील विविध भागातील माहिती गोळा करून ती मा. कुलसचिव यांच्या निदर्शनास आणण्यात आली होती. या संदर्भातील माहिती एकत्र करण्यात बीड जिल्हा समन्वयक कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती चे बाजीराव ढाकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदरच्या कोविड १९ संसर्गामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे उत्पन्नाचे साधन संपले आहे. यामुळे कुटुंबातील मुलामुलींना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनंत अडचणी येत असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चे कुलसचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते असे कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या व कोरोना संसर्गामुळे आई किंवा वडील यांचे निधन झालेले असलेल्या मुलामुलींनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे दिनांक २७/१०/२०२२ मआविवि/सिओ/४२१५/२०२२ यानुसार तात्काळ कोविड १९ मुळे मृत्यू झालेचा पुरावा म्हणून मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन बाजीराव ढाकणे, बीड जिल्हा समन्वयक कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती यांनी केले आहे.

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना मानवतेच्या भावनेतून आणि सहृदयतेने वागणून मिळालीच पाहिजे असेही हेरंब कुलकर्णी यांनी याप्रसंगी सांगितले.