विरवडे बु येथे अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

39

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.3नोव्हेंबर):- सीनानदी काठी वसलेल्या मोहोळ तालुक्यातील विरवडे बु मधील जागृत ग्रामदैवत हनुमान अखंड हरीनाम सप्ताहास 26 आक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीतब मोठ्या उत्सहात पाडव्याच्या शुभ महुर्तावर विना पूजनाने सुरवात करण्यात आले आहे,90 ते 100 वर्षां पूर्वीपासून परंपरेपासून चालत आलेल्या श्री तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री गुरुवर्य ह भ प विठुलं वासकर महाराज यांच्या प्रेरणेने या अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे.

हनुमान मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्सहात हा सप्तहा साजरा केला जातो ,गावात कोणतीही यात्रा। किंवा उत्सव नसल्यामुळे हा अखंड हरीनाम सप्तहा मोठा उत्सव समजून सर्व गावकरी मोठ्या उत्सहाणे हा सन साजरा करण्यात येतो ,दिवाळीच्या पाडव्या दिवशी या सप्तहाची सुरवात 26 आक्टोबर पासून सकाळी विना पूजन करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचले जाते,तर संध्याकाळी 5ते 6 प्रवाचन, 6ते 7 हरिपाठ ,7ते 8 भजन ,व 9ते11 कीर्तन ,11ते 2 हरिजागर, तर पहाटे 4 ते 6 काकडा आरती हे कार्यक्रम 7 दिवस राबिवले जातात सप्तहाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम आयोजित तर पहाटे 5 वाजता हनुमान पालखी व दिंडी प्रदक्षिणा संपूर्ण गावातून काढण्यात आली. ,गावातील पालखी मार्गांवर विविध प्रकारच्या आकर्षक ,मनमोहक रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या ,गावातून दिंडी प्रदक्षिणा घातल्यानंतर महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ,

हा सप्ताहा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ ,पंच कमिटी व वारकरी मंडळ व ग्रामस्थानी आदीसह परिश्रम घेतले.