विद्याभारतीच्या अखिल भारतीय (नेशनल) क्रिड़ा स्पर्धेसाठी सानिया सैय्यदची निवड

16

✒️पारशिवणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पारशिवनी(दि.3नोव्हेंबर):- नागपुरच्या विभागीय क्रिड़ा संकुल येथील सिंथेटिक ट्रेक वर विद्याभारती द्वारे आयोजित आंतरशालेय प्रांत स्तरीय एथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धामध्ये पारशिवनी तालुक्यातील लाल बहादुर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयची एथलेटिक्स खेळाडू सानिया इनायत अली सैय्यद हिने मुलींच्या सतरा वर्षीय वयोगटात सहभाग घेवून गोळा फेक व थाली फेक या दोन्ही क्रिड़ा प्रकारमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सोबतच येत्या 19 ते 23 नोव्हेबर 2022 रोजी कुरुक्षेत्र , हरियाणा येथे आयोजित होणाऱ्या विद्याभारती अखिल भारतीय (नेशनल) क्रिड़ा स्पर्धासाठी सानिया सैय्यदची निवड झालेली आहे .

सानियाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयच्या मुख्याध्यापिका राजेश्री उखरे ,विद्याभारतीचे नागपुर महानगरचें अध्यक्ष शैलेश जोशी, संयोजक जितेंद्र घोडदडेकर , नागपुर विश्वविद्यालयचे क्रिड़ा संचालक व नागपुर जिल्हा एथलेटिक्स असोसिएशनचे सचिव शरद सूर्यवंशी, उपाध्यक्ष राम वाणी , क्रिड़ा प्रशिक्षक शेखऱ कोलते आणि समस्त नागरिकांनी अभिनंदन केले आहे .