ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या संदर्भात गटविकास अधिकारी याना निवेदन

49

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4नोव्हेंबर):- तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या संदर्भात आज दिनांक 31ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती याना निवेदन देण्यात आले.गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांचा २००७ पासूनचा थकीत राहणीमान भत्ता,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी रक्कम ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावर वर्ग करण्यात यावी.

ग्रामपंचायत कर्मचारी यांची ऑनलाईन हजेरी संगनक परिचालका मार्फत विहीत वेळेत म्हणजे दर महिन्याच्या १ से ४ तारखे पर्यंत करून घेण्यात यावी गंगाखेड तालुक्यातील ज्या ग्रामपंचयात कर्मचारी यांची १० वर्षे सेवा पुर्ण झाली आहे त्यांची नावे ग्रामपंचायत कर्मचारी सेवा जेष्ठता यादीमध्ये समाविष्ठ करण्यात यावी.इत्यादी मागण्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलेले आहे निवेदनावर शिवराज डबडे, बालाजी मुंढे, परमेश्वर फड, मल्हारी गेजगे, रतन सावंत, नागेश डोंगरे, निवृत्ती धापसे, बालाजी कातकडे आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत