✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.4ऑक्टोबर):- – 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत सागर (मध्यप्रदेश ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोंडवाना युनवर्सिटी संघाची निवड जाहीर करण्यात आली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातून दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
सावरी भगत आणि पूजा नेवारे या तालुका क्रीडा संकुल वरोरा मधील सराव करणाऱ्या खो-खो खेळाडू आहेत. तालुका क्रीडा कार्यालय संचालित खो-खो प्रशिक्षण सकाळ व संध्याकाळ त्या नियमित सराव करत असतात.
त्यांना सुधीर कुंभारे (NIS) व संजय जांभुळे व स्वप्नील सांयकार यांचे मार्गदर्शन लाभते.पूजा आणि सावरी हे आनंद निकेतन कॉलेज वरोराचे विद्यार्थी आहेत. या खेळाडूंचे आनंद निकेतन कॉलेज चे प्राचार्य डॉ मृणाल काळे सर तसेच प्रा. तानाजी बायस्कर सर तालुका क्रीडा अधिकारी विजय ढोबाळे, तसेच तालुका क्रीडा समनवयक गणेश मुसळे यांनी विशेष अभिनंदन केले.