सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे वतीने संविधान बचाव पदयात्रा येत्या डिसेंबर पासून काढणार-भानुदास माळी

30

✒️सातारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सातारा(दि.5नोव्हेंबर):-अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संयुक्तिक विद्यमाने येत्या डिसेंबर महिन्यात *संविधान बचाव पदयात्रा* काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा हरियाणाचे माजी गृहमंत्री कॅप्टन अजयसिंहजी यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी सातारा जिल्हा काँग्रेस भवन मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी माळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार होते.

यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव साळुंखे , सरचिटणीस धैर्यशील सुपले, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, काँग्रेस अनुसूचित विभागाचे अध्यक्ष संजय तडाखे, सातारा तालूका काँग्रेस अध्यक्ष संदीप चव्हाण,जिल्हा सचिव रतन बाड, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव काळेल, शिवाजीराव गावडे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अल्पनाताई यादव, सातारा शहर काँग्रेस अध्यक्षा राजनीताई पवार, रझिया शेख, मनीषा पाटील, बाळासाहेब शिरसाट , जिल्हा प्रभारी विजयकुमार भोसले , दत्ता काशीद, प्रकाश फरांदे, रणधीर गायकवाड, सिद्धार्थ दैठणकर, नंदू साठे, विजय वायदंडे, रिटायर्ड नायब तहसीलदार तानाजी शिंदे, विकास जाधव, सर्जेराव कांबळे, अल्ताफ पठाण, अँड समीर शेख, संतोष डांगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा ओबीसी विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार यांनी कुस्ती क्षेत्रात चमकदार कामगिरी व प्राविण्य असलेले परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या माण तालुक्यातील पिंपरी गावच्या दोन छोट्या पैलवान मुलांना रुपये ५००० /- ची आर्थिक मदत माळी साहेबांच्या हस्ते दिली.

तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी खा. मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झाले बद्दल सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग अल्पसंख्याक विभाग आणि अनुसूचित विभागाचया वतीने अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच पाटण तालुका अध्यक्ष पदी मा. यशवंतराव सुतार आणि सातारा जिल्हा सरचिटणीसपदी मा. तानाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी ओबीसी आरक्षण / ओबीसी अल्पसंख्याक दलित समाजाला येणाऱ्या अडचणी संदर्भात व्यापक चर्चा करण्यात आली.डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कराड येथे ओबीसी अल्पसंख्याक आणि अनुसूचित विभागातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे एक दिवसीय प्रशिक्षण मंथन शिबिर होणार असून या शिबिरास काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते उपस्थित रहाणार असल्याचे भानुदास माळी यांनी यावेळी सांगितले.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस धैर्यशील सुपले यांनी केले. संजीव साळुंखे यांनी आभार मानले…