

🔹सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विमा हप्ता कमी करण्याची मागणी !
🔸फळ पीक विम्याचा प्रीमियम कमी करून घेतल्याशिवाय लढा थांबणार नाही !
🔹संत्रा उत्पादक शेतकरी न्याय हक्कासाठी आरपारची लढाई लढणार !
✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मोर्शी(दि.5नोव्हेंबर):-संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी जिल्हाभर फिरनार आहेत. आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आर पार ची लढाई लढण्याची तयारी आणि नियोजन जवळपास अंतिम टप्प्यात असून हिवरखेड येथील तोटे सभागृहामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक संपन्न झाली.राज्यात फळ पिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. मात्र, संत्रा फळ पीक विमा अचानक तीन पटीने महागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित आंबिया बहार फळ पीक विमा योजनेत अमरावती जिल्ह्यातील संत्रा फळ पिकाला शेतकऱ्यांच्या वाटय़ात हेक्टरी तीन पटीने वाढ केल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा लढा आपल्या न्याय हक्कासाठी आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कुणी कमी लेखू नये, शेतकऱ्यांचीच ताकद सरकारला वठणीवर आणू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आंबिया बहार फळ पीक विम्याचा प्रीमियम कमी करून घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. आता ही आरपारची लढाई आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आपली ताकद दाखवू देऊ, असा ईशारा हिवरखेड येथे झालेल्या बैठकीमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांनी दिला आहे.फळ पीक विम्याच्या विरोधात न्यायालाईन लढाई लढण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी जिल्हाभर फिरनार असून आता न्यायालयची आणि मोर्चाची तयारी नियोजन जवळपास अंतिम टप्प्यात असून हिवरखेड येथे झालेल्या बैठकीमध्ये युवा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिवरखेड गावांमध्ये मिळाला. फळ पीक विम्या विरोधात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा होणारा एल्गार, न्यायालाईन लढाई, संघर्ष, हा तमाम संत्रा उत्पादक शेतकरी, शेतमजुरांच्या रोषाचे प्रतीक ठरणार आहे. यापुढे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा लढा हा संघर्षाचे प्रमुख केंद्र म्हणून मोर्शी तालुक्याची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे.
संत्रा उत्पादक शेतकरी आणि शेतमजुरांच्या समस्यांबाबत बोलायला सध्या कुणीच पुढे येत नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच आपल्या हक्काची लढाई लढावी लागणार आहे. भीक मागण्यासाठी नव्हे तर आपला हक्क मागण्यासाठी आपण संघर्ष करत आहोत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षात सहभागी होणे हे कमीपणाचे नव्हे तर अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सर्वांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन प्रा. संजय पांडव यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना केले.फळ पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की कंपनीच्या फायद्यासाठी, असा प्रश्न संत्रा उत्पादकांना पडला असून संत्रा उत्पादक शेतकरी संकटाचा नेहमी सामना करीत फळपिकांचे रक्षण करतो. परंतु, या दरम्यानफळ पीक विमा महागला. परंतु त्या तुलनेत शेतकऱ्यांनी विमा संरक्षण मिळणारी रक्कम कमी आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विमा हप्ता कमी करावा अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी रेटून धरली.
पक्ष, राजकारण आणि संघटना बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून हा संघर्ष केला जात आहे. त्यामुळे कुणाच्या दबावाला आणि भूलथापांना बळी न पडता आपल्या हक्कासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी या लढाईमध्ये सहभागी व्हा, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे यावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले .
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नीसर्गाने झोडपले आणि आता सत्ताधारी, विरोधक – शासन, प्रशासन अशा सर्वांनीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. शहरातील नागरिकांनीही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बळ देण्याची नितांत गरज आहे. नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, शेतकरी, शेतमजूर अशा सर्वच घटकांनी एक दिवस आपल्या बळीराजासाठी देऊन शेतकऱ्यांचा हा लढा आणखी बुलंद करावा, असे आवाहन देखील यावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.
यावेळी या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय पांडव, संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके, हिवरखेड येथील सरपंच विजय पाचारे, नंदकिशोर गांधी, श्रणीत राऊत, कांचन कुकडे, सुभाष नागले, निलेश कडू, धिरज ठाकरे, रमेश गांधी, देवेंद्र गोरडे, नरेश वानखडे, अजय राजगुरे, जितेंद्र फुटाणे, वामन ढोमने, प्रथमेश राऊत, अनिल अमृते, मोहन होले, सुनील सदाफळे, राजीव भोजन, बाळासाहेब भोजने, अरविंद भुंते, अशोक गाहूकर, कैलास बारस्कर, दिवाकर ठाकरे यांच्यासह शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.