भारतीय विध्यार्थी मोर्चाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

    147

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

    म्हसवड(दि.6नोव्हेंबर):-भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा जिल्हा आयोजित दि.07 नोव्हेंबर 2022 रोजी महाराजा प्रतापसिंह हायस्कूल सातारा शाळा परिसर मैदानामध्ये महापुरुषांना मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन व सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजक चेतन आवाडे यांनी सांगितले.

    यावेळी भारतीय विध्यार्थी मोर्चा च्यावतीने आवाहन करणेत आले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन व राष्ट्रीय विध्यार्थी दिवस निमित्त महाराजा प्रतापसिंह भोसले महाविद्यालयाला भेट किंवा मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांनी समाजातील गरजू गरीब विध्यार्थ्यासाठी एक पेन,एक वही,अशा पद्धतीने शैक्षणिक साहित्य घेऊन यावे आणि ते भारतीय विध्यार्थी मोर्चा च्या स्टोलवर जमा करावे आपण आणलेले शैक्षणिक साहित्य गरीब आणि गरजू विध्यार्थ्यापर्यत पोहोचविण्याचे काम भारतीय विध्यार्थी मोर्चा करेल याची हमी देतो.

    बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थी मोर्चाकडुन आवाहन करण्यात आले आहे की विद्यार्थी दिनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे