सचिन मदनकर यांची तळोधी (बा) येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड

17

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि. 6 नोव्हेंबर):- नागभीड तालुक्यातील तळोधी बा येथील ग्रामपंचायत तळोधी बा च्या वतीने प्राथमिक कन्या शाळा या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली या तंटामुक्ती अध्यक्ष ही निवड करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष या पदाकरिता दोन व्यक्तींचे नाव घोषित करण्यात आले यात सचिन भास्करराव मदनकर व मनोहर वाढई यांनी फॉर्म भरून तंटामुक्ती समिती निवडणूक लढली. यात गुप्त मतदान घेण्यात आले. सचिन मदनकर यांना 232 मध्ये मिळाली तर मनोहर वाढई यांना 61 मते मिळाली . यात सचिन भास्कर मदनकर हे विजयी झाले.

यावेळी सभागृहात अध्यक्षपदी तळोधीच्या प्रथम नागरिक सरपंच छायाताई मदनकर या होत्या तर प्रमुख उपस्थिती वामनराव मदनकर, माजी ग्रामपंचायत ,सदस्य बाळू कामडी ,विलास बुरबांधे, मिलिंदअहिरकर,भगवान देशमुख तेली समाज अध्यक्ष, राहुल करिये, राजू बिरेवार ,ग्रामपंचायत उपसरपंच राजेश नरेंद्र खोब्रागडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, राहुल मदनकर ,कृष्णा बोडणे, संतोष बोडणे ,दिनेश हजारे, राजू पिसे, गजानन बुरबंदे, मनोज बोडघरे दत्तू मदनकर विशाल बारसागडे उपाध्यक्ष नाभिक संघ, बाबू कुरेशी ,रवी मदनकर ,वसीम छुकारीया, प्रवीण गिरडकर, वैभव जिभकाटे, सचिन भोंडे सुरज डहारे, गोकुळ पाकमोडे ,अजय मदनकर, अंकुश दिघोरे इत्यादी लोकांची उपस्थिती होती यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता सर्व मतदान शांततेत पार पडले यावेळी विजयी युवा उमेदवार सचिन मदनकर तंटामुक्ती अध्यक्ष झाल्याबद्दल यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.