भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या पदाधिकारी निवडी जाहीर

16

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.6नोव्हेंबर):-भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या पदाधिकारी निवडी आज जाहीर करण्यात आल्या. संघटनेचे राज्य अध्यक्ष, तिरंगा रक्षकचे संपादक विश्वास मोहिते यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र संपतराव मोहिते यांनी या निवडी जाहीर केल्या.पुणे येथील झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष विश्वास मोहिते होते. यावेळी इकबाल जमादार, बाबासाहेब कांबळे, सचिन बडेकर, प्रथमेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी खबरेआजतक लाइव न्यूज़ चे सांगली जिल्हा प्रतिनिधी संपत आनंदराव जाधव, सातारा जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र न्यूज चे खंडाळा तालुका प्रतिनिधी पोपटराव भिसे,ग डहिं ग्लज तालुका अध्यक्षपदी पत्रकार व “गडहिंग्लज बुलेटीन न्यूज”चे संपादक संतोष सदाशिव नाईक , आटपाडी तालुका अध्यक्ष अक्षय गायकवाड, तासगाव तालुका अध्यक्ष सोनाली झांबरे,निवड करण्यात आली आहे.

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेची स्थापना संपादक विश्वास मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. पत्रकारितेत काम करत असताना वार्ताहरांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या विविध अडचणी व समस्या याबाबतीत या बैठकीत चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध सवलती सरसकट सर्व वार्ताहरांना मिळाव्यात यासाठी या संघटनेच्या माध्यमातून लढा देण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला. निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एकजुटीने लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेत पुरोगामी विचारांच्या पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी यावेळी केले.