

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे जिल्हा प्रतिनिधी)
राजगुरूनगर(दि.7नोव्हेंबर):- राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पुर्ण झाली असून त्यात बँकेच्या १७ शाखापैकी १५ ठिकाणी २९ हजार २१९ सभासद मतदारांनी एकूण ६४ मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानापैकी ५७ टक्के मतदान झाले. राजगुरुनगर येथील मतदान केंद्रावर पहिल्या निवडणुकी पेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मत पेटी बंद झाल्याने उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीत भीमाशंकर सहकार पॅनल व राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलमध्ये खरी चुरस होनार आहे. हि निवडणूक दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक मानली जाते.सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकूण मतदान केंद्रे व झालेल्या मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
शिरूर -२०९
पुणे -१३३
आळंदी -१७५
जुन्नर – ८०
पाईट – १९५
देहू रोड – ५३२
कडूस -१८६१
आळेफाटा -१००
मंचर – ३३४
जुन्नर -७१
पाबळ – २५७
नारायणगाव -६९०
भोसरी – ७३९
चाकण -२९८५
म्हाळुंगे – २५२
राजगुरूनगर – ८०२८ या प्रमाणे एकूण :- १६६४१ झाले आहे.
या निवडणूकीत निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून खेड तालुका सहाय्यक निबंध हरिश्चंद्र कांबळे यांनी काम पाहिले. त्यांचे असलेले निवडणूक अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन यांनी योग्य नियोजन केले होते. निवडणूकीत उभे राहिले उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी हे येणाऱ्या मतदारास आपल्या चिन्हावरती मतदान करा असे सांगताना दिसत होते. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची मतदान करुन घेण्यासाठी लगबग चालू होती.