

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.7नोव्हेंबर):- भोसरी येथे भाजपा महिला मोर्चा व कविता भोंगाळे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीच्या निमित्याने शिवस्वराज्य किल्ला बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवराज आंबेकर याने साकारलेल्या प्रतापगडाच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्ष या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवराज आंबेकर, द्वितीय क्रमांक सार्थक बेहरा, तृतीय क्रमांक अनिकेत जोहरकर, चतुर्थ क्रमांक प्रेम कापसे, हर्ष कोडगीरे, यांनी स्पर्धेत बाजी मारली. विजेत्याना तसेच सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक पूर्णाकृती प्रतिकृती तसेच सन्मानपत्र देत सन्मानित भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचच्या वतीने किल्ला बनवणे स्पर्धेला भोसरी परिसरातील शिवभक्त तसेच बालचमुकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना कविता भोंगाळे – कडू म्हणाल्या की छत्रपती शिवरायांनी या मातीत जन्म घेऊन साडेतीनशे वर्ष होऊन गेले पण त्यांचा विचार, स्मृती गडकिल्ल्यांच्या रूपाने आपणा सर्वांना सदैव प्रेरणा देत आहेत. त्या गडकिल्ल्यांचे रक्षण, संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून या किल्ला स्पर्धेतून त्याच परंपरेला आम्ही कृतीची जोड देण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन शिव विचारांचा प्रसार करण्याचे कार्य केले आहे. यावेळी कल्पना धाडसे, मनीषा गंगणे, सुमन उंडे, आशा घुगे, वैशाली कापसे, चरणदास वानखेडे, वेदंता शिंदे, सुरेखा सवाई, जयंत अंबेकर, संतोष जठार, दत्ता मोहिते, प्रभाकर चव्हाण, विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.